मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील रखडलेल्या महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी निधी देण्याच्या मागणीचे पत्र जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सोलापूर येथे दिले.
सोलापूरचे पालकमंत्री निवड झाल्यावर प्रथम सोलापूर दौऱ्यावर आले असता मंगळवेढेकराच्या वतीने सत्कार करून त्यांना चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून प्रमुख चौकात सीसीटीव्ही बसविण्याच्या संदर्भात व अभ्यासिकेच्या संदर्भातील मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की मंगळवेढ्यातील रखडलेल्या दोन स्मारकाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन सत्कारानंतर बोलताना व्यक्त केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज