मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूरहून धावणाऱ्या सहा रेल्वेगाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग परावर्तित करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदिप हिरडे यांनी दिली. दक्षिण पश्चिम रेल्वेमधील हुबळी विभागातील गदग आणि हॉस्पेट सेक्शन दरम्यान बिनकदट्टी-गदग-कंग्नीहल, हरलापूर येथे नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसाच्या कालावधीसाठी सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हुबळी-सिकंदराबाद एक्सप्रेस, सिकंदराबाद-हुबळी एक्सप्रेस, सोलापूर-धारवाड पॅसेंजर, धारवाड-सोलापूर पॅसेंजर, सोलापूर-हुबळी पॅसेंजर, हुबळी-सोलापूर पॅसेंजर या गाड्यांचा यात समावेश आहे.
दरम्यान, मुंबई-गदग एक्सप्रेस, सोलापूर-गदग एक्सप्रेस, म्हैसूर-सोलापूर एक्सप्रेस, यशवंतपूर-बिकानेर एक्सप्रेस (साप्ताहिक), यशवंतपूर-बाडनेर एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग विविध दिवसांसाठी परावर्तित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज