मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दि 3 फेब्रुवारी 2020 रोजी निनावी तक्रार अर्जाद्वारे चाइल्ड वेल्फेअर कमिटी यांच्या मार्फतीने चळे ता पंढरपूर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असले बाबत अर्ज प्राप्त झाल्याने निर्भया पथक पंढरपूर व चाइल्ड वेल्फेअर कमिटी सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईमध्ये ठरलेल्या वेळी दि 4 रोजी 11:55 चा मुहूर्त साधला जायच्या आधी दोन्ही पथके पोहचून अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत ची माहिती देऊन बालविवाह यशस्वीपणे रोखला आहे.
याबाबत चाइल्ड वेल्फेअर कमिटी सोलापूर च्या अध्यक्षा यांचे समक्ष सदर मुलीस व तिचे पालकांना हजर केले आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे सो तसेच पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्री किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पो उप नि. गाडेकर ,पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे
बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही यशस्वीपणे बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच पंढरपूर उपविभाग यामध्ये अशा प्रकारचा बालविवाह अथवा महिला विषयीच्या अत्याचार अशा घटना घडू नयेत यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल सदैव दक्ष व तत्पर आहे.– डॉ.सागर कवडे (उपविभागीय पोलिस अधिकारी,पंढरपूर)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज