मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
एका बैलगाडीतून जास्तीत जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे,बैलांना खिळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर केल्याने पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाचे विशेष पोलीस पथकाने शुक्रवारी मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या २४ बैलगाडीचालकांवर मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बऱ्याच कारखान्याकडे बैलगाडीने ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस, बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राणीमित्रांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.
त्यामुळे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी.बी देवरे, प्राणी कल्याणचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सुनील हवालदार,पोलीस नाईक संतोष चव्हाण,महेश गायकवाड, राजू पवार,सुनील जतकर,बिराजदार यांची विशेष पथकाची नेमणूक करून अशा बैलगाडी चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्यानुसार या पथकाने पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्यात कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.
या पथकाने शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील ऊस कारखान्याकडे जाणाऱ्या २४ उस बैलगाडी मालकांवर प्राणी क्रूरता अधिनियम १९६० नुसार मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी मालकांमध्ये खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्ह्यात 16 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
मोहीम तीव्र करू…
साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे बैलगाडी मालक नियमांचे पालन करीत नाहीत. अनेक वेळा आजारी व अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर होतो. वास्तविक एका बैलगाडीतून एक ते दीड टन वाहतुकीचा नियम असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जात आहे. त्यामुळे बैलांचे हाल होतात या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात मंगळवेढा तालुक्यातून करण्यात आली असून ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक बी.बी.देवरे यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज