मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
बेकायदेशीररित्या दारू जवळ बाळगून विक्री करीत असताना मिळून आलेला आरोपी फक्रुद्दीन किनिकर यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी . व्ही . कपाडिया यांनी तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची माहिती अशी की , फिर्यादी विजयकुमार पवार हे पथकासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे परिसरात कामगिरीवर होते . त्यावेळी त्यांना आरोपी फक्रुद्दीन किनिकर हा संशयास्पद स्थितीत दिसून आला . त्याच्याकडे केलेल्या चौकशीत वडकी मध्ये बेकायदेशीररित्या १४ लिटर दारू मिळून आली .
याप्रकरणी त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले होते . सरकारतर्फे या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले . रासायनिक अहवाल व इतर पुरावा तसेच सरकार तर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली . या खटल्यात सरकार तर्फे अॅड . संतोष आ . पाटील यांनी काम पाहिले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज