मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथून अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले असून त्याचा मृतदेह महादेव डोके यांच्या उसाच्या शेतात शेळ्या राखणाऱ्या एका महिलेला आढळून आला आणि त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी जंगजंग पछाडत त्या अपहरण झालेल्या प्रतीक्षा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिक च्या शरीरावर जखमा आहेत
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यामुळे तालुकाभर खळबळ माजली आहे दरम्यान मयत कुटुंबीयांनी प्रयत्नात घेण्यास नकार दिला असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रतीक चा बळी गेल्याची भावना संतप्त कुटुंबियाकडून व्यक्त होत आहे .
आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे
दरम्यान ही घटना समजल्यापासून माचनूर व परिसरात शोककळा पसरली असून
माचनुर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या नऊ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती
शनिवारी तो सकाळी शाळा असल्याने शाळा संपल्यानंतर घरी आला नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेला तो घरी आला नाही म्हणून अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज