आरक्षण द्या अन्यथा येत्या निवडणुकीत अतिशय विचित्र चित्र पाहायला मिळेल
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन देवून चार वर्षे होत आली तरीही भाजप सरकारला त्यांच्यात या आश्वासनाचा विसर पडत आहे. म्हणून यापुढे कसल्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले. ते हुन्नूर ता.मंगळवेढा येथे आयोजित आरक्षण मेळाव्यात बोलत होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर हे होते. सभापती प्रदीप खांडेकर, सरपंच गुलाब थोरबोले, रविकिरण कोळेकर बापूसाहेब मेटकरी, यशवंत खताळ, धनाजी गडदे, अंकुश खताळ, दादासाहेब गरंडे, अनिल बोदाडे, नामदेव जानकर, दत्ता लवटे, बाळासाहेब बंडगर, शिवाजी पटापट, घनश्याम चौगुले, जगु गोरड, अमोल माने, बापूसाहेब पांढरे, बापूसाहेब गरंडे, वसंत गरंडे, आप्पासाहेब मेटकरी, विजय माने, दत्ता मासाळ, दत्ता बंडगर, अण्णासाहेब बंडगर, जगन्नाथ रेवे आदींजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, धनगर आणि धनगड या शाब्दिक खेळीत गुंतवून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप हे इथे सरकार करीत आहे.आम्ही महाराष्ट्रभर दौरे करून प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्या प्रत्येक तालुक्यात तसेच जिल्ह्यात एकही धनगड जातीचा माणूस आढळला नाही. एक तर धनगर जातीचा माणूस दाखवा अन्यथा लवकरात लवकर आम्हाला एसटीचे आरक्षण द्या. अन्यथा येत्या विधानसभेला व लोकसभेच्या निवडणुकीला अतिशय विचित्र चित्र पहायला मिळेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी उत्तमराव जानकर, बापूसाहेब मेटकरी, घनश्याम चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या धनगर समाजाच्या मेळाव्याला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.मंगळवेढा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले, यानंतर दामाजी च्या मूर्तीस हार घालून त्यांनी पाठखळ, खुपसंगी, जुनोनी, नंदेश्वर, भोसे या ठिकाणीही त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश विधाते, शाहूराज दळवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज