मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ओळखीच्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मेहुण्याने दाजीचा कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ९) रात्री दोनच्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी (पुणे) येथे घडली.
मोहन बाबुराव लेवडे (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी नंदा मोहन लेवडे (वय ३३) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणा विष्णू मुंजाजी जगाडे (वय ३०) याला अटक करण्यात आली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू हा फिर्यादी नंदा यांचा सख्खा भाऊ आहे.
नंदाचे पती मोहन यांचे घराजवळ राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणामुळे नंदा आणि मोहन यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. याशिवायन मोहनने नंदाकडे घटस्फोटाची मागणी केली होती. या अनैतिक संबंधामुळे बहिणीचे घर उध्वस्त होईल म्हणून विष्णूने मोहनला कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोहन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रविवारी विष्णू आणि मोहन दोघे घराच्या टेरेसवर दारू पीत बसले होते. दरम्यान, विष्णुने पुन्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहन आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यामुळे चिडलेल्या विष्णूने मोहन यांच्यावर कोयत्याने सापसार वार केले.
यानंतर मोहन यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नंदा धावत टेरेसवर आली. त्यावेळी मोहन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर विष्णू हातात रक्ताने माखलेला कोयता घेऊन उभा होता. त्यानंतर विष्णूने स्वतः पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून विष्णूला अटक केली. या घटनेचा पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज