mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयातील संतांमुळे देशात मंगळवेढयाला वेगळे स्थान : ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढयातील संतांमुळे देशात मंगळवेढयाला वेगळे स्थान : ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज

जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढयातील संतांची ओळख ही राज्यापुरती मर्यादीत नसून  संतांमुळे देशात मंगळवेढयाला एक वेगळे स्थान आहे. मंगळवेढयाचा रेंगाळत पडलेला तीर्थक्षेत्र प्रश्‍न  स्थानिक आमदारांना हाताशी धरून चालू पंचवार्षिक योजनेत मार्गी लावला जाईल.पंढरपूर येथे  पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पारायण कार्यक्रमाचे  नियोजन असून यासाठी सव्वा लाख वाचक  पारायणासाठी बसणार आहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळ हे गेल्या 15 वर्षापासून वारकर्‍यांसाठी सामाजिक काम करीत असून वारकर्‍यांनी आपली मुले याच क्षेत्रात घडवून देशात एक वेगळे स्थान निर्माण करावे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.

सोलापूर येथे 1 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या  भव्य वारकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे होते.

व्यासपीठावर ह.भ.प.तात्यासाहेब जगताप,ह.भ.प.बजरंग माळी,ह.भ.प.तुकाराम महाराज,भुयार,ह.भ.प.सिध्देश्‍वर कोळी,ह.भ.प.भागवत गवळी,ह.भ.प.पांडुरंग माने,ह.भ.प.शिवाजी घोडके, ह.भ.प.होनमुरे,ह.भ.प.बाळकृष्ण बळवंतराव ह.भ.प.प्रा.विनायक कलुबर्मे,ह.भ.प.सुदर्शन महाराज,खडकी आदी होते.

ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज म्हणाले,सोलापूरला दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

वारकरी मंडळाचे सदस्य होण्यासाठी वार्षिक वर्गणीची आकारणी नसल्याने मोठया संख्येने वारकरी मंडळात स्वयंप्रेरणेने सामील व्हावे.वारकरी मंडळ हे वैयक्तिक कुठल्याही राजकिय पुढार्‍यांना पाठींबा देत नसून ते राजकारण विरहित आहे.वारकरी मंडळाच्या गावागावात व शहरामध्ये  शाखा निर्माण करण्याचे काम भविष्यात संपूर्ण राज्यात केले जाणार आहे.वारकरी मंडळींनी आपल्या मुलांना वारकरी घडवून एक वेगळी संस्कृती निर्माण करावी असे ते म्हणाले.

वारकरी मंडळामध्ये महिला व युवांची स्वतंत्र कार्यकारणी करण्यात येणार आहे. दि. 1 डिसेंबर 1920 रोजी पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय पारायणाचा कार्यक्रम होणार असून या साठी देशाच्या कानाकोपर्‍यातून जवळपास सव्वा लाख वाचक येथे पारायणासाठी बसणार असून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावर  हा पहिलाच कार्यक्रम होत आहे.मंगळवेढा येथील तीर्थक्षेत्रासाठी व श्री संत चोखामेळा स्मारकासाठी यापुर्वी खा.डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी व  माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना  प्रत्यक्ष भेटून याबाबतचे निवेदन दिले आहे. या पुढेही अखिल भारतीय वारकरी मंडळ शासनदरबारी करेल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी,श्री दामाजी पंत यांच्या मुर्तीचे व विना पुजन करण्यात आले.

यावेळी सुरुवातीला  नुकतेच दिवे घाटात झालेल्या दुर्घटनेत वैकुंठवासी झालेेले ह.भ.प.सोपान महाराज नामदास व अन्य एक वारकरी तसेच 26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानोबा फुगारे यांनी केले.यावेळी बंडोपंत कुलकर्णी,बळीराम जांभळे,जोतीराम चांगभले,मोहन शेळके,संजय पवार,भाऊसाहेब बेलेराव,कुमार गायकवाड,नागनाथ गायकवाड,निवृत्ती पवार,आदर्श इंगळे,गुरुसिध्द गायकवाड,मल्लिकार्जून राजमाने,गोपाळ कोकरे,ज्ञानेश्‍वर भगरे,रमेश माने,बाळासाहेब जामदार,तानाजी चोपडे,अशोक घाडगे,अरविंद माने,भारत ढोणे,जयराज शेंबडे,शेखर सुतार,मिया आतार,दिनानाथ नांद्रेकर,मोहन जुंदळे,परमेश्‍वर पाटील,आप्पाराव मांजरे,धनाजी देवकर,दगडू ठोंबरे,स्वप्नील फुगारे,लक्ष्मण कोंडुभैरी, मारुती भगत सतीश दत्तू,आनंदाव जावळे,सतीश पाटील, भिमराव पाटील  यांच्यासह महिला वारकरी  व  पुरुष  वारकरी मोठया प्रमामाणात उपस्थित होते. सुत्रसंचालन विनायक कलुबर्मे,तर आभार निलेश गुजरे यांनी मांडले. 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने भालकेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने भालकेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा