मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण याअपह्त मुलाच्या हत्येप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी भारत दगडू शिवशरण (वय ५२ रा.माचणूर) या इसमास शनिवारी माचनुर येथून अटक केली असून त्याला पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता भारत शिवशरण यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रतिक शिवशरण (वय.९, रा.माचणूर,ता. मंगळवेढा) हा मुलगा त्याच्या घरापासून दि. 26 नोव्हेंबर 2018 रोजी अचानकपणे गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला परंतु शोध लागत नव्हता परंतु काही दिवसाने त्याचा मृतदेह छिन्न विच्छीन्न अवस्थेत मिळून आला. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात प्रथम अपहरण नंतर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून त्याचा नरबळी दिला गेला असल्याबाबतचे वातावरण परिसरात निर्माण झाले होते.
दरम्यान या गुन्ह्यातील संशयीत म्हणून एका १७ वर्षीय मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती त्यानेच खून केल्याचा प्राथमिक तपासात आढळून आले त्याने हा खून का केला आणखी काही त्याचे साथीदार यामध्ये आहेत का याचा तपास सुरू होता त्यानुसार दोन दिवसापूर्वी पोलिसांच्या विशेष पथकाने माचनूर परिसरातील काही घरांची तपासणी केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे. सध्या हत्येतील अल्पवयीन आरोपीस बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून संशयित आरोपी म्हणून भारत शिवशरण यास अटक केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज