मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । प्रेयसीसोबत होळी खेळायची म्हणून प्रियकराने तिच्या घरात प्रवेश केला. युवतीच्या वडिलांनी त्याला पाहिल्यानंतर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
अंकित दीक्षित असे प्रियकराचे नाव आहे. साहूकार परिसरात तो राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित प्रेयसीसोबत होळी खेळण्यासाठी तिच्या घरी गेला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर युवतीच्या वडिलांनी त्याला पाहिले आणि घराबाहेर काढले.
दारूच्या नशेत असलेल्या अंकितने स्वतःवर गोळी झाडून घेतली. जखमी झालेल्या अंकितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज