मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अंबड तालुक्यातील गोंदी हसनापूर (जि. जालना) रस्त्यावर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच 21 एडी 4165) उलटून चालक प्रदीप रामचंद्र नाहिराळे (30, रा.मोहितेवस्ती, अंकुशनगर) जागीच ठार झाले.
नाहिराळे पहाटे पाच वाजता साडेगाव येथून कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याकडे निघाले होते. हसनापूर फाटा ते गोंदी रस्त्यावर गावशिवेजवळ आले असता ट्रॅक्टरच्या मागे असलेली ट्रॉली उलटली. ट्रॉलीचे टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
सकाळी फिरण्यास गेलेल्या काही महिलांनी ही घटना बघितली. त्यांनी गोंदी पोलिसांना फोनवर तत्काळ कळविले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज