mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनश्री महिला पतसंस्था व मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धनश्री महिला पतसंस्था व मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारासह विविध जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे.






सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे.



धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून पूरग्रस्तांसाठीचे हे योगदान मोलाचे आहे, असे सांगून पूरग्रस्तांबद्दल दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल धनश्री परिवाराचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले. 



याप्रसंगी दामाजी शूगर्स माजी संचालक रामकृष्ण नागणे, प्रभाकर कलुबर्मे, युवराज गडदे, महा ऑरगॅनीक अॅन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांच्यासह इतरजण उपस्थित होते.



कोल्हापूर, सांगली व भीमा नदीकाठच्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पूरग्रस्तांना धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मंगळवेढा व धनश्री मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा यांच्या वतीने विविध स्वरूपात मदत केली आहे. यामध्ये सुरवातीला कोल्हापूर व सांगली या भागातील पूरग्रस्तांसाठी दोन्ही संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी आपल्या घरातुन भाकरी, चपाती व संस्थेमार्फत पाणी बॉटल, बिस्किटे पाठविल्या आहेत. 



सांगली भागातील 250 कुटुंबातील पूरग्रस्तांना मदत म्हणून एक लाख रुपयांचे चादर व सतरंजी वाटप केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठ असलेल्या पंढरपुर शहरात तसेच कौठाळी आणि शिरढोण या गावासह मंगळवेढा तालुक्यातील तांडोर, तामदर्डी, सिद्धापूर या गावातील पूरग्रस्त नागरिकांना एक किलो साखर, तांदूळ व चहापत्ती देऊन मदत केली आहे. त्याचबरोबर आता पूरग्रस्तांसाठी कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. अशाप्रकारे धनश्री परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत पूरग्रस्तांसाठी जवळपास तीन लाख रुपयेपर्यंत मदत केली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
छावा संघटना मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदी सुरज फुगारे तर जिल्हा संघटक पदी मनोज चव्हाण यांची निवड

छावा संघटना मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदी सुरज फुगारे तर जिल्हा संघटक पदी मनोज चव्हाण यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 10, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा