मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
फलटण येथील फूड बर्ड ऍग्रो प्रायव्हेट कंपनीच्या कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी संजय भगवान मोरे (वय 39, रा. दौलतनगर, सातारा) आणि जॉन्सन ख्रिस्तोफर रायचुर (वय 33, कोरेगाव, सातारा) या दोघांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
दरम्यान, तिघांना न्यायालयात हजर केले असता 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीचे संचालक राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे (दोघे रा. सरडे, ता. फलटण, सातारा) आणि सचिन तुकाराम करे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली नाही, त्यांनी कागदपत्रांसह तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कंपनीचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज