मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निवडणुकीच्या कामांमध्ये हयगय केल्याप्रकरणी दोनशे शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या कामात हयगय भोवली
हिंगणा तालुक्यात केवळ 15 ते 20 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले. तहसीलदार संतोष खांडरे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मेश्राम यांनी 5 फेब्रुवारी रोजी बीएलओचे काम नाकारणाऱ्या दोनशे शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार दोनशे शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज