मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडलं नसल्यामुळे जगभरातील देशांमधील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तरीही समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आपलं कर्तव्य ओळखून सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत करत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही करोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान बजावलं आहे.
सुरेश रैनाने पंतप्रधान सहायता निधीला ३१ लाख तर उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची रक्कम दिली आहे. करोनाविरोधातील लढ्यात आपण सर्वांनी आपल्याला जमेल तितकी रक्कम दान करावी असं रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज