मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बीसीसीआयने पंतप्रधान आपत्कालीन निधीकरिता ५१ कोटींची मदत केल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रहाणेच्या आधी सचिन तेंडुलकरने ५० आणि सुरेश रैनाने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती . बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान केले . तर , माजी सलामीवीर गौतम गंभीरने खासदार फंडातून ५० लाख रुपये दिल्ली सरकारला दिले आहेत . त्यापूर्वी इरफान व युसूफ पठाण बंधूंनी चार हजार मास्कचे वाटप केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज