mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक:किरकोळ कारणासाठी १४ वर्षाच्या मुलाची हत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
धक्कादायक:किरकोळ कारणासाठी १४ वर्षाच्या मुलाची हत्या


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । खोड्या करतो म्हणून एका 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या आत्येच्या पतीने गळा दाबून मारल्याची घटना शनिवारी घाटकोपरच्या अल्ताफ नगर, रस्सीवाला चाळ येथे घडली आहे. शिव शंभो पवार(14) असे मृत मुलाचे नाव आहे. तर हिंमत ज्ञानी गोहिल (68) असे आरोपीचे नाव आहे.

घाटकोपरच्या गोळीबार रोडला लागूनच असलेल्या अल्ताफ नगरमधील रस्सीवाला चाळीत शिव त्याच्या आईसह राहत होता. त्याच्या घराच्या बाजूलाच त्याची आत्या पती हिंमतसोबत राहते. हिंमत हा प्रचंड रागीट आहे. त्याची परिसरात वारंवार भांडणे होत असत.

लहान मुलांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे हे त्याचे नित्याचे होते.शिव त्याची खोडी काढत होता. त्याचा प्रचंड राग हिंमतच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी शिवला घरी एकटा पाहून हिंमत घरात घुसला आणि त्याने एका कपड्याच्या सहाय्याने शिवचा गळा आवळून त्याची हत्या केली.

हत्येनंतर घराला कुलूप लावून त्याने घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्याने आपण शिवचा गळा आवळला असल्याची माहिती दिली. मधल्या वेळेत शिवचा चुलत भाऊ घरी आला. त्याने टाळा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्याला घरात शिव निपचित पडलेला दिसला. त्याने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी एकत्रित येऊन शिवला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. शिव हा आईचा एकुलता एक मुलगा आधार होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सीएए, एनआरसी या कायद्यावरून जाणीवपूर्वक चर्चा घडवण्याचे प्रयत्न

सीएए, एनआरसी या कायद्यावरून जाणीवपूर्वक चर्चा घडवण्याचे प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा