mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकारण न करता योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
राजकारण न करता योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. अजूनही आपण प्रस्ताव द्यावेत आपले सर्व प्रस्ताव मंजूर करून देऊ. मी जे बोलतो ते आजपर्यंत करीत आलेलो आहे. असे प्रतिपादन संत दामाजी कारखान्याचे चेअरमन श्री समाधान आवताडे यांनी केले. ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने आयोजित गावावार विचार-विनिमय बैठकी प्रसंगी बोलत होते. गुंजेगांव महमदाबाद [शे.], ल. दहिवडी, गणेश वाडी, शेलेवाडी मरवडे, बालाजीनगर, डोणज, भालेवाडी या गावांमध्ये आयोजीत बैठकीप्रसंगी बोलत होते.






पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणुका ह्या येत असतात जात असतात परंतु जनतेच्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकला नाहीत. आज पर्यंत राजकीय मंडळींनी आश्वासने दिली, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. रस्त्याचे प्रश्‍न, आरोग्यविषयक प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, विजेचा प्रश्न हे सारे प्रश्न जसेच्या तसेच राहिले आहेत. आज आम्ही मार्केट कमेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्केट कमेटी मध्ये कांद्याला सर्वोत्तम दर शेतकऱ्याला मिळवून दिला आहे. 



पुढील काळात बेदाणे व डाळिंबाचे सौदेही मंगळवेढा मार्केट कमिटी मध्ये सुरू होणार आहेत. यावेळी मला आपल्याला एकच सांगायचे आहे ज्या काही ही संस्था ताब्यात आहे संत दामाजी दामाजी कारखाना मार्केट कमिटी जिल्हा परिषद पंचायत समिती व सर्व संस्थांच्या माध्यमातून पारदर्शक काम करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे सर्व निवडणुकीत आपण भरभरून दिले आहे आणि त्याची उतराई करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आपली काही बाबतीत प्रगती झाली असेल परंतु ती झालेली प्रगती इतरांमुळे नाही. तर तुमच्या कष्टामुळे झालेली आहे. आज माता-भगिनी ही ही बचत गटाच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी मदत मदत करण्यास कटिबद्ध आहे. आज एक महिनाभर आम्ही गावभेट दौरे करीत आहोत. एक जाणवलेली गोष्ट म्हणजे सर्वत्र बदलाचे वारे आहेत आणि ही मोठी संधी आहे. यासाठी आपल्या सहकार्याची गरज असल्याचे शेवटी ते म्हणाले सदर प्रसंगी येताळा भगत सर म्हणाले मोठ्या कर्जाच्या बोजाखाली ही संत दामाजी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालून चेअरमन समाधान आवताडे व संचालक मंडळाने हे आवाहन स्वीकारले. 



आतापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची खड्डे बुजवत कारखाना ते चांगला चालवीत आहेत. समाधान आवताडे यांची काम करण्याची हातोटी वेगळे आहे. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची धमक आहे. यासाठीच समाधान आवताडे यांना एक वेळ संधी देण्याचे काम करूया असे, ते म्हणाले. 



या गावभेट दौऱ्याच्या वेळी दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, दामाजी कारखान्याचे माजी संचालक बाळकृष्ण सुडके, बाळासाहेब अवताडे, तानाजी दिघे सर, शिवाजी जाधव, अक्षय टोमके, सोमनाथ ठुमके, कदम सर, गणपत पवार, शशिकांत पवार, केदार गुरुजी आदींनीही मनोगत व्यक्त करताना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी समाधान आवताडे हेत सक्षम पर्याय आहे असे सांगितले. 



या गावभेट दौरा याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर मार्केट कमेटी सभापती सोमनाथ अवताडे उपसभापती विमलताई पाटील कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, पप्पू काकेकर अशोक केदार, विजय माने, भारत निकम आदी मान्यवर उपस्थित होते तसेच धनंजय पाटील, सुनील डोने, महादेव चौगुले, संजय पाटील, हनुमंत कुंभार, बिराप्पा सलगर, राजाभाऊ मेतकुठे, महमदाबाद चे उपसरपंच दिपक सुडके, रावसाहेब चौगुले, गोविंद शीलवंत, डॉक्टर साबळे, सुहा रेंगे, श्रीमंत अनपट, विकास पाटील, लक्ष्मी दहिवडीचे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ टाकने, संतोष जालगीरे, तानाजी पाटील, दिलीप कुमार, जोंधळे बाळकृष्ण, बर्गे संजय,  डॉक्टर प्रकाश बर्गे, रखुमाई सोनवणे, शहाजी बापू सोनवणे, विकास सोनवणे, गणेश वाडी चे उपसरपंच बाबासाहेब लांडे, डॉक्टर सुभाष तानगावडे, तानगावडे गुरुजी, तुकाराम वाकडे, सुनील तानगावडे, पांडुरंग वाकडे सर, तानाजी दिघे सर, जनार्दन इंगळे, बाळू काका अवताडे, विठ्ठल तानगावडे, शेलेवाडी चे सरपंच ज्योतीराम चव्हाण, महादेव चव्हाण, दत्तू चव्हाण, विठ्ठल चव्हाण, राजाराम चव्हाण, नवनाथ अवताडे, मरवडे चे उद्योजक शंकर जाधव, विठ्ठलराव पाटील, बाळासो गायकवाड, नामदेव बनसोडे, दत्ताजी जाधव, सौ वनिता कदम, राजाराम कदम, राहुल घुले, सोमनाथ टोमके, विशाल धुळे, चंद्रकांत मासाळ दगडू मासाळ घुनाथ चव्‍हाण बालाजी नगरचे सरपंच शंकर पवार, उपसरपंच एकनाथ राठोड शशिकांत पवार कुंडलिक पवार प्रकाश जाधव महिला बट बचत गटाच्या अध्यक्षा पारुबाई राठोड विमल राठोड दोनचे रामचंद्र बिराजदार धोंडाप्पा बुगडे सावकार, नेमन्ना पुजारी, बसवेश्वर मीराकोर, बसवेश्वर चिकणी, राजेंद्र केदार, राजेंद्र कट्टीमनी बालेवाडी चे उपसरपंच नितीन गवळी, अर्जुन शिवश,रण सोसायटी चेअरमन दशरथ दवले, संतोष गवळी, संतोष गवळी, सुभाष गायकवाड, अरुण गवळी, जयसिंग गवळी, रामा घाडगे, एकनाथ दवले, महादेव नवले, महादेव बोरकडे, दिलीप शिवशरण, बबन शिवशरण, तसेच या विचारविनिमय बैठकी प्रसंगी संबंधित गावाचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले तर आभार राजाभाऊ मेतकुठे यांनी आभार  मानले.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

November 14, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अखेर ठरलं! नगराध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत होण्याची चिन्हे; ‘या’ तिघींमध्ये पेटणार सामना? मंगळवेढ्यातील राजकारण फिरणार; नगरसेवक उमेदवारांची जुळवाजुळव सुरू

November 14, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

भाजपच्या प्रतिष्ठेची तर घड्याळ, धनुष्यबाण, काँग्रेस, तुतारी, ठाकरे सेनेच्या अस्तित्वाची लढाई; आ.आवताडेंना रोखण्यासाठी अखेर ‘समविचारी’ची स्थापना; जगताप वेट & वॉच?

November 13, 2025
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद मिळावे, भाजपपुढे ठेवला प्रस्ताव; भाजपकडून प्रतिसाद न आल्यास आमचा ‘हा’ निर्णय जाहीर करू; राष्ट्रवादीचे भाजपवर दबावतंत्र

November 12, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीला रंग चढू लागला; दुसऱ्या दिवशी नगरसेवकपदासाठी ‘इतके’ अर्ज दाखल

November 12, 2025
मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

मोठी बातमी! नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ तीन जणांनी केली उमेदवारीची मागणी; मुलाखतीसाठी हजर असणाऱ्यांनाच मिळणार तिकिट

November 11, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

भाजपमध्ये यंदा ‘नवे चेहरे, नवा आत्मविश्वास’ ही सूत्रे लागू होण्याची चिन्हे; काही माजी नगरसेवकांना भाजप देणार ‘नारळ’; नगराध्यक्षपदाची उमेदवारी…

November 11, 2025
नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

November 8, 2025
Next Post
धनश्री परिवाराच्या वतीने मंगळवेढा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

धनश्री परिवाराच्या वतीने मंगळवेढा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 15, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी! ऑनलाईन सर्व्हरच्या भीतीने अर्ज आता ‘ऑफलाईन’ ही स्वीकारणार; रविवारी सुट्टीच्या दिवशीही संधी

November 15, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले?; पराभवाची 15 कारणे

November 15, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

November 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा