मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणाला दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही या मतदारसंघाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना अद्यापही प्रतीकच्या कुटूंबीयांची साधी भेट घेण्याची संवेदनशिलता दाखवलेली नाही. राईनपाडा येथील तालुक्यातील 5 लोकांची ठेचून हत्या केल्यानंतरही खा.बनसोडे सुमारे 8 दिवस शेकाकुल कुटुंबीयांच्याभेटीसाठी आले नव्हते. त्यापाठोपाठ प्रतीक शिवशरण या बालकाची हत्या झाल्यानंतरही खा. बनसोडे शिवशरणच्या हत्येच्या घटनेपासून दूर राहिले आहेत. त्यांच्या या असंवेदनशीलतेविषयी तालुकावासीयातून संताप व्यक्त केला जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
प्रतीक शिवशरण ची हत्या उघडकीस आल्यापासून जनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जवळपास भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी, विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अशा विविध माध्यमातून तपासाच्या गतीबाबत आणि बेजबाबदार पोलिस अधिकार्यांच्या निलंबनाबाबत सातत्याने आसूड ओढले जात आहेत.
अशातच खा.बनसोडे हे शनिवारी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुका दौर्यावर आले होते.एका चित्रपटाच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर या चित्रपटातील गाण्यावर यामधील कलाकारांसमवेत त्यांचेही पाय थिरकले. त्यामुळे त्यांच्यातील अंगी असलेल्या कलाकाराने आपली कामगिरी चोख बजावली असली तरी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवशरण कुटुंबाच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करणे टाळले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ. प्रशांत परिचारक हे भारिप नेते प्रकाश आंबेडकर,आ.भारत भालके, आ.प्रणिती शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या घटनेचा निषेध करत तपासाबाबत लक्ष घातले आहे. खरेतर शोकाकुल कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देऊन खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी प्रयत्न केले. या भागाचे खासदार असलेल्या बनसोडे यांनी 18 दिवसानंतरही प्रतीकच्या कुटुंबीयांची भेट घेऊन साधे सांत्वन करण्याची संवेदनशिलता दाखवलेली नाही.
त्यामुळे खा.बनसोडे यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाठीमागे राईनपाडा हत्याकांडाच्या वेळी देखील त्यांनी मंगळवेेेेढा तालुक्यातील खवे येथील त्या अन्यायग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेण्यासाठी येण्यास 8 दिवसांचा विलंब लावला होता. येत्या सहा महिन्यात लोकसभा निवडणुका आहेत. येणार्या निवडणुकीत पक्षाने त्यांना अजून एकदा संधी दिली तर मतासाठी अनेक चकरा मारतील पण सर्वसामान्य मतदारांच्या अडचणीसाठी मात्र वेळ काढत नाहीत. हे या घटनेवरून दिसून येते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज