

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील शिवाजी चौक परिसरातील एक पान टपरी अज्ञात चोरटयाने फोडून आतील सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
युवराज नागेश निर्मळ (रा .कोंडुभैरी गल्ली , मंगळवेढा) यांचे शिवाजी चौक परिसरातील भाजी मंडईजवळ आदित्य पान शॉप या नावाची टपरी आहे.


११ जानेवारी रोजी रात्रौ ९ . ०० ते १२ जानेवारी रोजी सकाळी ७ . ३० च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी सदर बंद टपरीचे शटर उचकून दुकानात ठेवलेले सिगारेटची पाकिटे , तंबाखचे पुडे , बॉडी स्प्रे व ड्रॉवरमधील ३५०० रुपयांची रोकड असा एकूण २० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

अशी फिर्याद युवराज निर्मळ यांनी मंगळवेढा पोलिसात दिली .पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार राऊत हे करीत आहेत.








बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












