मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या कार्यालयातील बैठक व्यवस्थेची दिशा बदली असली तरी त्यांचा गृहप्रश्न कायमच राहिली आहे. जुने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अद्याप शासकीय बंगला सोडला नाही. त्यामुळे नूतन जिल्हाधिकार्यांना शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची गेल्या 15 दिवसांपूर्वी बदली झाली आहे. त्यांची बदली वीज वितरण महामंडळाच्या सहसंचालकपदी झाली आहे. त्यांच्या जागी समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.
मात्र, दुसरीकडे पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अद्याप आपला शासकीय बंगला सोडला नाही. त्यांनी अद्याप आपल्या घरचे सामान हलविले नाही. त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी शंभरकर यांना अद्याप शासकीय घराचा ताबा मिळालेला नाही. जिल्हाधिकार्यांनी कार्यालयातील बैठक व्यवस्था बदलली असली तरी गृहप्रश्न कायम राहिल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली आहे. त्यामुळे शंभरकर यांना सध्या तरी आपला मुक्काम शासकीय विश्रामगृहातच करावा लागत आहे.
दरम्यान, पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे जोपर्यंत नेमून दिलेल्या ठिकाणी रुजू होणार नाहीत, तोपर्यंत ते घर सोडणार नाहीत, हे सत्य आहे. भोसले हे जोपर्यंत शासकीय बंगला सोडणार नाहीत, तोपर्यंत शंभरकर यांना शासकीय विश्रामगृहाचाच आधार घ्यावा लागणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज