मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
लोणंद ( ता . खंडाळा , जि . सातारा ) येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करून त्यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून सातारचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली .
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर बोलावून आपणास बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी शहर पोलिस ठाण्यात दिली होती . त्यानुसार माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांवर दाखल झाला होता . उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता . त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उदयनराजे यांनी स्वत : अटक करून घेतली होती .
सोना अलॉईज प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते . उदयनराजे भोसले विरुध्द रामराजे नाईक निंबाळकर असा रंग या राजकीय संघर्षाला चढला होता .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज