मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा
विनापरवाना वाळू चोरी करणारे वाहन पकडल्यानंतर वाळू चोरांनी तलाठ्याला अरेरावीची भाषा करून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला .
४ फेब्रुवारी रोजी रात्री १ च्या दरम्यान विनापरवाना वाळू चोरी करून जाणारे एम . एच . ४५ / ए . एफ . २६८३ हे वाहन कडलासचे तलाठी चंद्रकांत पिसे यांनी पकडले . बाळू चोरी करणारे सोनू इनामदार , गणेश शिंदे व एक अनोळखी इसम अशा तिघांनी तलाठी पिसे यांना अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली .
तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करत तलाठी पिसे यांच्या मोटरसायकलला वाहनाने धडक देऊन मोटरसायकलचे ५ हजार रुपयांचे नुकसान केले . या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज