mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; प्रवण मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्राचा निर्णय; राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; प्रवण मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्राचा निर्णय; राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? जाणून घ्या…

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्राने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


 

प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून ३१ ऑगस्ट २०२० ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये हा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय त्याचे नियम कसे असतात हे पाहुयात.

देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. 

यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतात.


 

जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तत्काळ सूचना देण्यात येतात. म्हणजेच प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय दुखवट्यानुसार ३१ ऑगस्ट २०२० ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहिल याची दक्षता घेण्यात येणार आहे. ७ सप्टेंबरपासून राष्ट्रध्वज पूर्ववत चढविण्यात येईल.

यासंदर्भात कोण घेतं निर्णय?

केंद्र पातळीवर केंद्रीय गहमंत्रालय यासंदर्भातील निर्देश जारी करते. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा जाहीर करु शकतात. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

प्रणव मुखर्जी हे देशाचे माजी राष्ट्रपती होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबद्दलची माहितीही गृहमंत्र्याच्या माध्यमातून देण्यात येते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले महात्मा गांधी पहिले व्यक्ती होते. यांच्याव्यतिरिक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांना शासकीय सन्मानाने निरोप देण्यात आला होता. 

या राजकीय नेत्यांव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांनाही शासकीय इतमामात अंतित निरोप देण्यात आला होता. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. मात्र सामाजिक क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा निर्णय सरकारच्या निर्णयानुसार घेतला जातो. यासंदर्भातील काही ठोस नियम नाहीत.

कधी कधी जाहीर करण्यात आला राष्ट्रीय दुखवटा?

२०१३ – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.

२०१८ –  द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१८ – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर…

ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.

सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.

शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.

अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.

After Pranab Mukherjee’s death, the Center declared seven days of national mourning

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshMaharashtra Maza

संबंधित बातम्या

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेत्यांनो..! महायुती की स्वबळावर? निवडणूक लढवायची निर्णय घेण्याचे अधिकार ‘यांना’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिकार

October 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष  खुला महिला प्रवर्गासाठी राखीव; अनेकांचा हिरमोड; आता उमेदवार निश्चितीसाठी वेग येणार

October 6, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

महायुतीमध्ये पहिली ठिणगी! झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

October 5, 2025
ठाकरे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

मोठी बातमी! बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, ‘या’ जेष्ठ नेत्याने केला उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप

October 3, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ‘या’ तारखेला आरक्षण सोडत; ‘या’ नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक; असा आहे सोडतीचा कार्यक्रम

October 2, 2025
Next Post
विठ्ठल मंदिर खुलं करा पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

विठ्ठल मंदिर खुलं करा पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

कामाची बातमी! …तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

October 15, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

राजकीय कार्यकर्त्यांनो! निवडणूक न लढवताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य बनता येणार? ‘इतक्या’ कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा