टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा आणि सोलापुरात उमेदवार कोणीही असो, फरक पडत नाही. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाहून मतदान करतील.. हा आत्मविश्वास बाळगून निवडणूक लढणाऱ्या भाजपला लोकांनी झटका दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदारसंघातील लोकांना जाऊन मिसळणे विजयासाठी कामी आले.
लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये देशात मोदी लाट होती. यंदाच्या निवडणुकीतसुद्धा ही लाट कायम राहील. ऐनवेळी उमेदवार निश्चित करून लढू असा भाजपच्या आमदारांचा होरा होता.
निवडणूक जाहीर झाली तरी भाजपचा उमेदवार निश्थित नव्हता. याउलट काँग्रेसने सहा महिन्यांपूर्वी शहरात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीचे फलक लावले. २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेत मोहोल, पंढरपूर या दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या सोबत होता.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराला या भागातूनच सुरुवात केली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांचे दोन दौर पूर्ण झाले होते.
माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास मोहिते-पाटील कुटुंबाचा विरोध होता. आपण लढणारच ही भूमिका घेऊन धैर्यशील मोहिते-पाटील मतदारसंघाचे दौरे करीत होते.
जिल्हा बँकेसह विविध प्रकरणांत मोहिते-पाटील यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे ते बंडखोरी करणार नाहीत, असा भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचा अंदाज होता बंडखोरीची भूमिका कायम ठेवल्यामुळे लोकांनी धेर्यशील यांना साथ दिल्याचे दिसून आले.
हे मुद्दे ठरले निर्णायक
मराठा आरक्षण, अंतरवली सराटी येथील प्रकरणाची एसआयटी चौकशी या मुद्यावरून ग्रामीण भागातील वातावरण भाजपविरोधात होते. है मुद्दे कैच करण्यात महाआघाडीला यश आले.
सोलापूर महापालिका प्रशासनाच्या कारभाराशिरोधात नागरिकांमध्ये तीरा नाराजी आहे.
शहरातील अनियमित पाणी पुरवठा, स्मार्ट सिटीची बोगस कामे यावरून लोक नाराज होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बेरजेचे राजकारण केले. काँग्रेस सोडून गेलेल्यांना परत घेतले, विरोधात माणाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.(स्रोत:लोकमत)
सोलापूरकरांनी त्यांना नाकारले
मागील दहा वर्षातला रोष जनतेने मतदानातून दाखवून दिला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, विकासाच्या मुद्यावर लढलो. दुसरीकडे अनेक नेत्यांनी मुद्दे बाजूला करण्याचा प्रयत्न केला. जाती- धर्मात वाद लावून सोलापूरला तोडण्याचा प्रयत्न केला.
लोकांनी त्यांना नाकारले. मतदान केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मला फोन करून धीर दिला होता. लोकशाहीमध्ये अफाट ताकद आहे हे दाखवून दिले. भाजपचा राम मंदिराचा मुद्दाही चालला नाही. लोकांना काम महत्त्वाचे हे कळले आहे. आता जिल्हा काँग्रेसमय करणार.- खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघ
भाजपला जनतेने धडा शिकवला
रणजितसिंह निंबाळकर, गोरे, श्रीकांत भारतीय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर पडीक असायचे. त्यांनी मतदारसंघातील जनतेसोबत कधीही संपर्क ठेवला नाही. आमच्यावर उमेदवार लादू नका, असे मी वरिष्ठांना सांगत होतो. कागदोपत्री कामे रंगविणाऱ्या माणसाचे नाव पहिल्या यादीत आले.
लोकांची कामे करणारे, सगळ्यांना मदत करणारे मंत्री नितीन गडकरी यांचे नाव चौथ्या यादीत होते. भाजपला जनतेने धडा शिकवला आहे. माझ्या विजयासाठी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजयदादा यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले.-खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज