टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर लोकसभेत सलग 2 वेळा पराभूत झालेल्या वडिलांचा मुलीने चांगलाच वचपा काढला आहे. या ठिकाणी भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आमनेसामने होते. प्रणिती शिंदे यांनी लढतीमध्ये विजय मिळवला आहे.
राम सातपुतेंचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी इतिहास रचला आहे. मधल्या फेरीत पिछाडीवर गेलेल्या प्रणिती शिंदे यांनी अखेर 74 हजार 814 मतांनी विजय मिळवलाय.
प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्या महिला खासदार बनल्या आहेत. प्रणिती शिंदे यांचा 74 हजार 814 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ईव्हीएममध्ये 74197 मते तर पोस्टल मध्ये 617 मतांची आघाडी होती. तर प्रणिती शिंदे यांना एकूण 6,20,225 मते, भाजपच्या राम सातपुते यांना 5,46,028 मते मिळाली आहेत. पोस्टल मतदानात प्रणिती शिंदे यांना 617 मते मिळाली आहेत.
कोणता मुद्दा ठरला महत्त्वाचा?
भाजपकडून माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना ऐनवेळी दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती. तर काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन महिनेआधीच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने ऐनवेळी घेतलेली माघार, त्यानंतर वंचितकडून अपक्ष आतिश बनसोडे यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये या मतदारसंघात थेट लढत आहे.
या मुंद्यांमुळे गाजली निवडणूक
– राम सातपुते यांनी प्रचारात मुद्दे आणताना विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता.
– शिंदे कुटुंबीयांवर केलेला परिवारवादाचा आरोप
– माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या चाळीस वर्षांत सोलापूरचा विकास न केल्याचा आरोप
– सोलापुरातील धार्मिक विषयांवर केलेली विधानं
– प्रणिती शिंदे यांचा भगिनी असा केलेला उल्लेख
प्रणिती शिंदे
– आमदार प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून राम सातपुतेंवर केलेली टीका
– सोलापुरातील अनेक रखडलेले विकास कामे कळीचा मुद्दा बनवले.
– आमदार प्रणिती शिंदे यांची आक्रमक विधाने चर्चेचा विषय ठरले
मराठा आरक्षण ठरला कळीचा मुद्दा
सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत. मात्र यंदा सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे लिंगायत समाजाच्या मतदानामध्ये फूट पडली. तर मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर पंढरपूर मोहोळ विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाची भूमिका मतदार संघात निर्णायक ठरणार आहे.लोकसभा मतदारसंघातील ओबीसी मतदारांनी मात्र भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज