मंगळवेढा टाइम्स : संपादक – समाधान फुगारे
मंगळवेढा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिवशंभो पतसंस्थेच्या संस्थापिका तेजस्विनी कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

तेजस्विनी कदम यांच्या नावासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाले आहेत. आमदार समाधान आवताडे, खासदार धनंजय महाडिक व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे.

आमदार समाधान अवताडे यांच्याकडूनही या नावाला पसंती असल्याचे बोलले जात असून येत्या काही दिवसात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे भाजपचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांनी पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

तेजस्विनी कदम यांनी नाट्य परिषद व इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून सामाजिक कामात मोठी झेप घेतली आहे. शहरातील महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम देखील राबविले आहेत.

सुप्रिया जगताप यांनी श्रीराम फौंडेशनच्या माध्यमातून शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन जनतेसमोर त्या जात आहेत. तेजस्विनी कदम व सुप्रिया जगताप या एकाच गल्लीतील असल्यामुळे सामोरा समोर लढत लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून लवकरच नगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केले जाणार असून कदम यांच्या नावाची औपचारिकता बाकी असल्याचे कदम समर्थकांकडून बोलले जात आहे.

दरम्यान, मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवत आहे जागे संदर्भात वाटाघाटी नाही झाल्या तर मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी, शिवसेना हे देखील स्वबळावर लढणार आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












