mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जी जागा बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची ‘हे’ कारणं; वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2021
in सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे.

भगीरथ भालके यांचा निसटता पराभव झाला असून पहिल्या फेरीपासून ते 38 व्या फेरीपर्यंत त्यांनी प्रचंड टफ दिली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला होता.

तरीही भगीरथ भालके यांचा पराभव का झाला? त्यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती का मिळाली नाही? राष्ट्रवादीची गणितं नेमकी कुठं चुकली? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

चुकीचा उमेदवार

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादीत संभ्रम होता. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.

मात्र भालके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार असावा म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. भगीरथ भालके हे दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.

भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेले कारखान्याचे अध्यक्षपद भगीरथ भालके यांच्याकडे देण्यात आलं. 2017 मध्ये कासेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता.

म्हणजे वडील आमदार असतानाच भगीरथ यांनी दोन चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवूनही पराभूत झाले होते. त्यानंतर ते राजकारणात फारसे दिसले नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भगीरथ यांचा पराभव झालेला असतानाही त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेचं तिकीट दिलं.

त्यामुळे राष्ट्रवादीने चुकीचा उमदेवार दिल्याची पंढरपूरकरांमध्ये भावना होती. त्यामुळेही त्यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

डबघाईला आणलेला विठ्ठल साखर कारखाना

भालके यांच्या निधनानंतर भगीरथ यांच्याकडे विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली. कारखान्याच्या एकूण 21 पैकी 3 संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली.

भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.

यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी भारत भालकेंनी कर्ज मंजूर करुन घेतल्याने कारखाना पुन्हा सुरु झाला. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून भालके कुटुंबीयांना कारखाना कर्जातून बाहेर काढता न आल्याने कामगारांच्या रोषाचा भगीरथ यांना फटका बसल्याचं सांगण्यात येतं.

जनतेशी संपर्क नाही

भगीरथ यांनी चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या आधी किंवा त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क आला नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे करायला हवी होती.

मात्र त्यांनी ते केलं नाही. त्याचा फटकाही त्यांना बसल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. या उलट भाजपचे समाधान आवताडे हे गेल्या काही वर्षांपासून थेट जनतेच्या संपर्कात होते. समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांचे ग्रामीण भागात चांगले जाळे आहे. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार असूनही आवताडे यांनी 50 हजाराच्यावर मते घेतली होती.

त्यामुळे भाजपचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना भाजपने तिकीट दिलं आणि प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे आवताडे यांनी या निवडणुकीत बाजी मारल्याचं दिसून आलं.

यंत्रणा तोडकी, साधनं नाही

निवडणूक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची यंत्रणा अत्यंत तोडकी होती. या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियापासून कॉर्नर बैठकांपर्यंतच्या सर्व प्रचार तंत्रावर जोर दिला होता. त्या तुलनेत आवताडे यांची यंत्रणा कुठेच दिसत नव्हती.

शिवाय परिचारक कुटुंबाने आवताडे यांचा प्रचार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवताडेंसाठी जोरदार बॅटिंग केली. प्रचंड मोठ्या सभा घेतल्या.

त्या तुलनेत राष्ट्रवादीचे मोजकेच नेते या मतदारसंघात फिरले. उपमुख्यमंत्री अजित पवार उशिराने प्रचारासाठी आले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष न येता व्हर्च्युअल सभा घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अॅडमिट असल्याने ते प्रचाराला येऊ शकले नाही.

राष्ट्रवादीकडून केवळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच एक हाती किल्ला लढवला. या मतदारसंघात 15 टक्के धनगर समाज आहे. हा मतदार भारत भालके यांच्याबाजूने होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजात जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

त्यावेळी धनगर समाजातील पडळकरांनी क्रेझ दिसून आली. धनगर समाजातील एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील धनगर नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.

राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज

भगीरथ यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अपयशाचाही फटका बसल्यांच दिसून आलं. राज्य सरकारने कोरोनाचं संकट नीट हाताळलं नाही. विठ्ठलाचं मंदिरही या सरकारने बंद केलं.

संकटाच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल
पाठवलं, शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, कोरोना संकटात आर्थिक मदत दिली नाही, आदी मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी ठरले. त्याचा अप्रत्यक्ष फटका भगीरथ यांना बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.(स्रोत : tv9मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भगीरथ भालके

संबंधित बातम्या

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी

August 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण म्हणत पत्नीला पैशासाठी चाबकाने मारहाण करत छळ; गळफास घेऊन महिलेने केली आत्महत्या

August 22, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

धाकधूक वाढली! उजनीतून भीमा नदीत ‘इतक्या’ हजार क्युसेक तर वीर धरणातून ४७ हजार क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

August 20, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणूका ‘या’ महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या

August 20, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण भरले ‘एवढे’ टक्के; मुसळधार पावसामुळे उजनीतून दोन महिन्यात सोडले ६३ टीएमसी पाणी; धरणात दौंडवरून आवक सुरूच

August 19, 2025
Next Post
मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न; इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : आ.समाधान आवताडे

मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न; इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : आ.समाधान आवताडे

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

क्यूआर स्कॅन करून देता येणार अवैध धंद्याची माहिती; थेट टेलिग्रामवर होणार संपर्क, ‘या’  पोलिसांचा उपक्रम

August 28, 2025
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर रक्तदान शिबीराचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती; रक्तदान करण्यासाठी केले आवाहन

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर रक्तदान शिबीराचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती; रक्तदान करण्यासाठी केले आवाहन

August 28, 2025
दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

दानशूर! मराठा आंदोलनात अनिल सावंत वगळता अनेक मराठा पुढारी गायब; समाजाचा रोष उफाळला, चर्चला उधाण; सावंत यांनी केली सढळ हाताने मदत

August 28, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

करारा जवाब मिलेगा! भारत सरकारनं आखली मोठी योजना; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा सामना करण्यासाठी खेळी

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा आज मंगळवेढा शाखेचा दुसरा वर्धापनदिन सोहळा; 100 टक्के वसुली, लेखापरीक्षकांनी दिला ‘अ’ वर्गाचा दर्जा; कमीत कमी वेळेत सोनेतारण कर्ज 80 हजार प्रति तोळा

August 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा