टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांचे संयुक्त विद्यमाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे ज्वारी प्रक्रिया उद्योग या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या धोरणानुसार सोलापूर जिल्ह्या साठी ज्वारी पिकाची निवड केली असल्याने सदर योजनेचे प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील शास्त्रज्ञ प्रा.दिनेश क्षीरसागर (विषय विशेषज्ञ अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान) यांनी ज्वारी मध्ये असणाऱ्या पोषणमूल्य, ज्वारी प्रतवारी व चाळणी बरोबरच ज्वारीपासून तीन महिन्यापर्यंत टिकणारे
ज्वारीचे पीठ, लाह्या, रवा, बिस्कीट, केक, पास्ता, फ्लेक्स, ढोकळा, इत्यादी उपपदार्थ बनवण्यासाठी आवश्यक मशिनरीज व बनवण्याची पद्धत याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी ज्वारी प्रक्रिया उद्योग व्यवसाय करण्याची इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाचे संपर्क साधून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले.
कृषी सहाय्यक प्रशांत काटे यांनी ज्वारी लागवड तंत्रज्ञान भौगोलिक मानांकन प्राप्त मंगळवेढा ज्वारी साठी अथोरिझेड युजर नोंदणी करणे बाबत माहिती दिली.
कृषी पर्यवेक्षक राजकुमार ढेपे यांनी ई पीक पाहणी अॅप वर आपल्या पिकाची नोंद कशी घेता येईल, याबाबत सांगितले.
आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम सावंजी यांनी आत्मा अंतर्गत सुरू असलेल्या विविध बचत गटांनी ज्वारी प्रक्रिया उद्योगात ज्वारी स्वच्छता व प्रतवारी करून छोठ्या पॅकेटमध्ये विक्री करावी तसेच हुरड्याचे उत्पादन करून व्यावसायिक तत्वावर हुरडा पार्टी आयोजित कराव्यात असे सांगितले.
यावेळी राजाराम सूर्यवंशी, मच्छिद्र भोसले, माने , मुबारक शेख , प्रवीण हजारे, मनोज पुजारी , मंदाकिनी सावंजी, माहेश्वरी महाडिक, कृषीराज शेतकरी बचत गट , बळीराजा शेतकरी बचत गट , आत्माचे शेतकरी मित्र व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र पाटील यांनी तर आभार शिवकुमार पुजारी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज