टीम मंगळवेढा टाईम्स ।
बहुचर्चित ठरलेल्या बिग बॉस मराठीच्या अखेर तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकम ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
या महाअंतिम सोहळ्यामध्ये जय आणि विशाल निकम यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, अखेर प्रेक्षकांचा कौल विशालकडे झुकला आणि तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीमध्ये जय, विशाल, विकास, उत्कर्ष आणि मीनल शहा हे पाच स्पर्धक Top 5 फायनलिस्ट ठरले होते.
परंतु, ग्रँड फिनाले सुरु झाल्यानतंर अवघ्या काही वेळातच मीनल आणि उत्कर्ष यांना या शोचा निरोप घ्यावा लागला.
त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विकास पाटील याचाही प्रवास येथीच संपला. त्यामुळे शेवटी जय आणि विशाल यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व जिंकल्यानंतर विशालला बक्षीस स्वरुपात ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तर उपविजेता ठरलेला जयलादेखील सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान,’बिग बॉस’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विशालला खरी ओळख ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे मिळाली.
या मालिकेत त्याने ज्योतिबाची भूमिका साकारली होती. त्याचसोबत त्याने ‘धुमस’, ‘मिथून’, ‘साता जल्माच्या गाठी’ यांसारख्या काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज