मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लोकांमध्ये विश्वास निर्माण करून ठेवी मिळविणे, हे खऱ्या अर्थाने धनश्री व सिताराम परिवारातील संस्थेचे यश आहे. सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री परिवार व सिताराम परिवाराने आपली वाटचाल सुरू ठेवली असुन सर्वसामान्यांच्या आर्थिक जडणघडणीत ‘धनश्री’चे मोठे योगदान राहीले आहे. असे प्रतिपादन धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.
धनश्री महिला पतसंस्थेची 27 वी, धनश्री मल्टीस्टेटची 12 वी व सदगुरु सिताराम महाराज अर्बन सोसायटीची 1 ली वार्षिक सर्वसाधारण सभा काल सकाळी 11.00 वा. वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली. याप्रसंगी प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे, व्हा. चेअरमन प्रभावती कनशेट्टी, धनश्री मल्टिस्टेटचे व्हा. चेअरमन युवराज गडदे, सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे व्हा.चेअरमन लक्ष्मण वाघमोडे, जकराया शुगरचे चेअरमन अॅड. बिराप्पा जाधव,
संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, धनश्री महिला पतसंस्थेचे लेखापरीक्षक आनंद करवंदे, धनश्री मल्टीस्टेट व सिताराम अर्बनचे लेखापरीक्षक निलकंठ वाघचौरे, सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे, अॅड. दिपाली काळुंगे-पाटील,
मोहन बागल, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर, राजेंद्र पाटील, यादाप्पा माळी, डॉ. एम.आर टकले, शिवाजीराव पवार, ज्ञानदेव जावीर, भाऊसाहेब केदार, किसन सावंजी, प्रकाश काळुंगे, रामचंद्र बंडगर, राजाराम सावंत, गणेश जाधव, सतिश दत्तू, सुयोग गायकवाड, सीमाताई काळुंगे,
राधिका पाटील, मनिषा कुंभार, सुवर्णा पवार, संगीता सावंजी, कल्पना गडदे, स्नेहल सावंत, गोकुळा जावीर, सुनीता नागणे, सुरेखा कलुबर्मे, यमुना शिंदे, शकुंतला लिगाडे, उमाकांत कनशेट्टी, बसवराज मोगले, प्रभाकर कलुबर्मे, दत्तात्रय नागणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टी स्टेटच्या प्रगतीत संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे मोलाचे योगदान असून आपण सर्वांनी आजपर्यंत दाखविलेला विश्वासामुळे धनश्री पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट व सिताराम महाराज अर्बन सोसायटी या तिन्ही संस्थेने 1300 कोटीचा टप्पा पार केला आहे. तसेच 15000 कोटीची उलाढाल झाली आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारची मंगळवेढा तालुक्यातील एक हजार कोटी ठेवीची संस्था म्हणून सर्व ठेवीदार,खातेदार, सल्लागार, संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून एकमेव ठरली आहे.
चालू आर्थिक वर्षात धनश्री महिला पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश व धनश्री मल्टीस्टेटच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहिर केला आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये या दोन्ही संस्थेने उत्तुंग अशी घोडदौड करत यशाच्या टप्प्याकडे ही संस्था वाटचाल करीत आहे.
गेली सव्वीस वर्षे वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीत पार पडत आहे. लहानात लहान उद्योगापासून ते कारखानदारीपर्यंत पतसंस्था व मल्टीस्टेटच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले आहे.
धनश्री परिवाराच्या माध्यमातून वर्षानुवर्षे अनेक समाजाभिमुख कार्यक्रम राबवीत आहे. धनश्री व सिताराम परिवाराला सुसंस्कृत व अध्यात्मिक अधिष्ठान असावे म्हणून गेल्या पाच वर्षापासून धनश्री प्रवचनमाला सुरू केली आहे. समाजाचे ऋणी म्हणून यापुढेही धनश्री परिवाराच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख काम करत राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा.शोभाताई काळुंगे म्हणल्या, धनश्री परिवारातील दोन्ही संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळा बरोबरच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व प्रामुख्याने अत्यंत तत्पर विनम्रपणे सर्वांना सेवा देणारे कार्यक्षम कर्मचारीवृंद यांचे मोलाचे योगदान आहे. स्पर्धेच्या युगात देखील संस्थेचे कर्मचारी सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करत आहेत.
आजच्या काळात पात्र आणि वेळेवर कर्जाची फेड करणाऱ्या कर्जदारांची संस्थेला नितांत गरज आहे. त्याप्रमाणे कर्जदारांची गरज पाहून त्यांना कर्ज पुरवठा केला जातो. ऑडीट ‘अ’ वर्ग म्हणुन असणाऱ्या धनश्री पतसंस्थेला 2022- 2023 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 2 कोटी 20 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे
तसेच धनश्री मल्टिस्टेटला 2022- 2023 आर्थिक वर्षात सर्व तरतुदी करून 3 कोटी 26 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. धनश्री पतसंस्थाच्या 27 वर्षात 14 शाखांपैकी 10 शाखेने स्वमालकीच्या इमारती उभ्या केल्या आहेत.
तर धनश्री मल्टिस्टेटने 12 वर्षात 33 शाखांपैकी 15 शाखांसाठी स्वमालकीच्या जागा खरेदी केल्या आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जकराया शुगरचे चेअरमन अॅड.बिराप्पा जाधव, लेखापरीक्षक आनंद करवंदे, निलकंठ वाघचौरे, सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव जावीर यांनी केले.
यावेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित या वर्षी संस्थेने सभासदांना 11 टक्के लाभांश देत असून 31 मार्च 2023 अखेर संस्थेच्या 558 कोटी 17 लाख ठेवी आहेत. त्यामध्ये गतवर्षापेक्षा 94 कोटी 70 लाख इतकी वाढ झाली आहे.
तसेच आर्थिक वर्षात 2 कोटी 20 लाख इतका नफा झाला आहे त्याचबरोबर 2023-24 चे अंदाजपत्रकास मंजूरी घेतली.
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित संस्थेने 10 टक्के याप्रमाणे लाभांश देत असून 31 मार्च 2023 अखेर संस्थेच्या 726 कोटी 33 लाख ठेवी आहेत.त्यामध्ये गतवर्षापेक्षा 170 कोटी 86 लाख ठेवीची वाढ झाली आहे. तसेच आर्थिक वर्षात 3 कोटी 26 लाख इतका नफा झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी 2023-24 चे अंदाज पत्रकास मंजूरी घेतली.
श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटीचे सरव्यवस्थापक नितिन जगताप यांनी वार्षिक अहवाल वाचून दाखवित 31 मार्च 2023 अखेर संस्थेच्या 6 कोटी 76 लाख ठेवी आहेत. त्यामध्ये आज अखेर 5 कोटी ठेवीची वाढ झाली असून 11 कोटी ठेवी पूर्ण झाल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी 2023-24 चे अंदाज पत्रकास मंजूरी घेतली.
याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या व धनश्री मल्टिस्टेटच्या सर्व शाखेतील उत्कृष्ट खातेदार यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेटचे दोन उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर दोन्ही संस्थेच्या प्रत्येकी तीन शाखेचा उत्कृष्ट शाखा, सर्वोत्कृष्ट शाखा व उत्तेजनार्थ शाखा म्हणून गौरव करण्यात आला. तसेच वर्षभर सर्वात जास्त पिग्मी संकलन करणाऱ्या दोन्ही संस्थेतील प्रत्येकी तीन पिग्मी एजंटचा गुणगौरव याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पांडुरंग भाकरे, सुनील पाटील, अंकुश पडवळे, शशिकांत केदार, बबन सरवळे, सागर मिसाळ, संजय चौगुले, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर कांबळे, सिद्धेश्वर मोरे, अनिल वगरे, बाळासाहेब गडदे, हिम्मतराव भाकरे, दशरथ जाधव, अमोल कोरके, तानाजी गोपने, योगेश ताड, अनिल गायकवाड, संजय पवार, गणपत बागल, अनिल पाटील, तुकाराम जाधव,
रेवणसिद्ध जुंदळे, समाधान इमडे, बापू गवळी यांच्यासह सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच धनश्री महिला पतसंस्थेचे व मल्टिस्टेटचे सर्व शाखाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार नितीन कदम, रवी सांगोलकर व राणी उन्हाळे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज