समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स टीम
मंगळवेढा शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे रुग्ण उपाचारासाठी दाखल होत असून, रुग्णांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवण मोफत पुरविण्याचा उपक्रम मंगळवेढा भारतीय जनता पार्टी व गौरीशंकर बुरकुल मित्रपरिवार यांच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
नातेवाईक जिथे असतील, तिथे जेवण पाेहोच केले जाणार असून, रुग्णाच्या नातेवाइकांनी मोफत जेवण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल यांनी केले आहे.
शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळुन येत आहेत. तसेच शहरातील अनेक ठिकाणी खाजगी कोविड रुग्णालये कार्यरत असुन रुग्णालयाचे क्वारंटाइन सेंटर आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत जेवणाची सुविधा भाजप व गौरीशंकर बुरकूल यांच्यातर्फे दि.27 एप्रिल पासून ते दि.15 मे पर्यंत मोफत डबा देण्याची सेवा पुरविण्यात येणार आहे.
मोफत जेवण सेवा पुरविण्याबाबत गौरीशंकर बुरकूल म्हणाले की, कोरोनाचा कहर सुरू आहे. बाहेरगांवाहून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची स्थिती बिकट आहे. रुग्णांना बेड, औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मिळण्याबरोबरच जेवण मिळविण्यासाठी नातेवाइकांना फिरावे लागत आहे.
आम्ही रुग्णांच्या नातेवाइकांना दोन वेळा जेवणाची व्यवस्था केली आहे. जे रुग्ण ज्या हॉस्पिटलला असतील, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नातेवाइकांना मोफत जेवण दिले जाईल.
कॉल केल्यानंतर मिळणार दोन वेळचे मोफत जेवण
नातेवाईकांना दुपारच्या जेवणासाठी सकाळी १० ते ११ या वेळेत तर रात्रीच्या जेवणासाठी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत कॉल करून दवाखान्याचा पत्ता, आपले नाव सांगितल्या नंतर जेवणाचा डबा पोहच मिळणार आहे
नातेवाईकांनी ‘या’ नंबरवर करा कॉल
सागर ननवरे (73 50 57 39 39) सुमित बुरकुल (77 19 98 80 20) सैफन शेख (98 81 51 51 97) सुरज जाधव (75 88 50 48 08) अण्णा चौगुले (98 50 79 11 43) या क्रमांकावर संपर्क करावा. अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी दिली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज