मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विश्वास बबन भागवत (वय 35) यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबारात मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेत समोर घडली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
विश्वास बबन भागवत भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय होता.
भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ते काही लोकांच्या समवेत बसलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी भागवत यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भागवतांना उपचारासाठी तातडीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, तिथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. शेतीच्या या वादातून भागवत यांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत भस्मे हे पुढील तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज