विकासाच्या नावावर बिल काढण्यासाठी मंगळवेढा शहराचं भकासीकरण; गौरीशंकर बुरकूल यांचा आरोप
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपरिषदेमध्ये गेली चार वर्षे एकमेकांचं तोंड न बघणारे नगरसेवक, ज्यांची उघड तक्रारी देखील झाल्या. यासाठी मंगळवेढा नगरपरिषद चर्चेत होती. मग आता अशी काय जादू घडली एकमेकांविषयी तक्रार करणारे, नगराध्यक्ष यांना पदावरून कमी करण्यासाठी जीवाचं रान करणारे, आता काय करतायेत ? असा सवाल भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी केला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, नगराध्यक्षांच्या मिस्टरांचा वावर नगरपरिषदेमध्ये असल्याचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले, मग आता गप्प का ? दोन वर्षांपूर्वी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष एकत्र आले असते तर आज शहरात थोडाफार विकास दिसला असता.
फक्त बगीच्याकरण करणे म्हणजे विकास करण म्हणायचे का ? चांगल्या सिमेंट रस्त्यावर पेव्हरब्लॉक करणे म्हणजे विकास म्हणायचा का ? एकीकडे सर्वाना सांगायचं नवीन रस्ता करायचा असेल तर जुना रस्ता उकरून करावा.
पण रस्त्यात तर जुन्या रस्त्यावर नवा रस्ता काम चालू असते. याला नगरपरीषदेचा खरा पणा म्हणायचा का ? सांगोला नाका ते बोराळे नाका मेन गटार रस्त्यावरुन वाहते नागरिकांना त्याचा त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
सध्या डेंगू सारखा आजर सगळीकडे बळावला आहे. पिण्याचे पाणी दूषित येते. तर तीन दिवसाला पाणी मिळते, अंदाजे वर्षातले एकशे वीस ते दीडशे दिवस पाणी मिळते. आता तर दूषित पाणी मिळत आहे.
या सर्व गोष्टीवर प्रधान सचिव नाराज असल्याचे दि.24 च्या पुढारी पेपर मध्ये वाचायला मिळाले. मग सचिव नाराज कसे ? त्यांना भाजपचा म्हणणार काय ? प्रधान सचिव तीव्र नाराजी व्यक्त करत असतील तर आम्ही नागरिक आहोत.
एकमेकांचे तोंड न बघणारे रोज एकमेकांशी गळ्यात गळा का घालतात ? निवडणूक तोंडावर आल्यावर तातडीने समाजाला उपयोगी नसणारी आणि लवकरात लवकर बिल काढता यावीत अशी कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
नगराध्यक्षा हुशार आहेत त्यांनाही चाललेलं पटत नाही, पण एकाच या हट्टापायी त्यांचाही नाईलाज आहे. हे लक्षात येते, तशी चर्चाही शहरात आहे.
सांगोला नाक्यावर अतिक्रमण केले आहे अस म्हणता , पण ते पंचवीस ते तीस जण गरीब आहेत. गेली चाळीस वर्षापासून त्यांचं वास्तव्य आहे. घरकुलासाठी 2018 ला अर्ज दाखल केल्याच्या पोचपावती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशाने 2010 पूर्वीच्या सर्व झोपडपट्टी रहिवासी यांना ती जागा कायम केली आहे. ही माहिती कदाचित नगराध्यक्षांना नसावी ! या सर्वांसाठी नगरपालिकाच्या माध्यमातून दोन मजले अपार्टमेंट काढून कायमस्वरूपी निवारा या लोकांसाठी केला असता तर अभिमान वाटला असता.
नागरिकांची घरे काढण्यासाठी नोटिसा देता, त्यांना बेघर करून बगीचाकरण्याचा हट्ट कशासाठी ? त्या ठिकाणी राहणारे नागरिक हे सर्व समाजाचे आहेत. त्यांना बेघर करून याठिकाणी असणाऱ्या समाजा समाजात तेढ निर्माण करून त्यांच्यात भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचे षड्यंत्र चालू आहे.
भाजप नेत्यांच्या बांधकाम साहित्याचे दुकान समोर अतिक्रमण असल्याचे सांगता आहे. त्यांनी आपले नगरपालिकेमध्ये रीतसर बांधकाम परवाना काढला असून त्या बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट साठी तात्पुरती व्यवस्था केली आहे. सदर बांधकाम परवाना लागणारी फी सुद्धा नगरपालिकेत भरली आहे. याला जर अतिक्रमण म्हणत असाल , तर बारमाही शनिवार पेठेत दूध बासुंदी करण्यासाठी मेन रस्त्यावर लाकडे पडतात त्याला काय म्हणायचे ? अनेक वेळा टू व्हीलर वाले रात्री लाकडांना अडकून पडतात.
असो , उनी धुनी न काढता आपण सर्वांना आवडणारी कामे केली असती तर अभिमान वाटला असता . जनतेच्या न्याय व हक्कासाठी केली जाणारी आंदोलने हे जर स्टंटबाजी म्हणत असाल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल असेही गौरीशंकर बुरकुल म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज