टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथील वाड्यावस्त्यांवर व मुस्लिम वस्त्यावरील जाणारी भगीरथ लाईट गेली अनेक वर्षे सुरू होती, पण ती गेल्या काही दिवसात तोडली आहे.
तेव्हापासून ते आज तागायत वाड्यावसत्यांवर व मुस्लिम समाजाच्या वस्तीवर संध्याकाळी लाईट नसते, त्यामुळे लहान मुलांना डासांशी सामना करावा लागत आहे.
डेंगू-चिकनगुनिया चे मच्छर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी कुटुंब हे हैराण झाले आहेत. यांचा जनावरांना देखील त्रास होत आहे. कारण लाईट नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तर अधिकारी हे उजेडात फॅन खाली झोपत आहेत.
लाईट नसल्यामुळे शाळेच्या मुलांचे शिक्षण धोक्यात येत आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महावितरणाच्या व महापारेषणच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन उभे करणार आहे. गेली कित्येक वर्षे बालाजी नगर मध्ये लाईटचा लपंडाव सुरू असतो.
याआधीही बालाजी नगर मध्ये ऑडिशनल डी. पी. बसवा म्हणून प्रहारने मागणी केली होती. पण याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, काही गावांमध्ये भरपुर डी पी आहेत पण बालाजी नगर च्या पुढारी लोकांना विकास होवु द्यायचा नाही पण आता प्रहार बालाजी नगर चा विकास केल्याशिवाय राहणार नाही
त्यामुळे मुस्लिम समाज व शेतकऱ्यांना आ.बच्चू कडू यांची प्रहार संघटना न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास शेतकऱ्यांना वाटू लागला आहे.
त्यामुळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी, तालुका अपंग क्रांती तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, शहराध्यक्ष युवराज टेकाळे,
शहर उपाध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, संपर्क प्रमुख शकील खाटीक, अजय राठोड, शशिकांत पवार,व गावातील लोकांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहे. असे प्रहार जनशक्ती पक्षाचे ता. उपाध्यक्ष संजय राठोड यांनी सांगितले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज