टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या वार्षिक सभेवरून पाठीमागचे काही दिवस झालं पंढरपूर परिसरात आरोप प्रत्यारोपणा आणि चर्चाना उधाण आले होते.
विठ्ठल सहकारीचे चेअरमन भगीरथ भालके यांनी विठ्ठलची वार्षिक सभा येत्या 30 तारखेला ऑनलाइन पद्धतीने घेण्याचं जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर विविध आरोप करत तोफ डागण्यात आली होती.
शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, विठ्ठलचे संचालक युवराज पाटील, भाजप किसान मोर्चाचे माऊली हळनवार यांच्याकडून भगीरथ भालके यांच्यावर सभादांच्या बिलाचा मुद्दा, कारखाना सुरू करण्याबाबतची असमर्थता या मुद्द्यांवरून जोरदार टीका करण्यात आली होती.
या सर्व प्रकरणा नंतर आता भगीरथ भालके यांनी याबद्दल खुलासा केला असून, विठ्ठलची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने व्हावी यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली असता त्यांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगण्यात आलय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज