मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
गहाणमुक्तीचा दस्त नोंदविणेबाबत बँकेशी विचारणा करणे, एनओसी घेणे आवश्यक आणि क्रमप्राप्त असताना अप्रामाणिकपणे जमिनीची विक्री करुन बँकेचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांसह दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रंगा भीमा मोरे, परशुराम भीमा मोरे, यल्लाप्पा भीमा मोरे, लक्ष्मीबाई भीमा गायकवाड, मेल्लूबाई भीमा गायकवाड (सर्व रा.परांडा रोड,बार्शी), महंमद इम्रान जहांगीर काझी (रा.नाईकवाडी प्लॉट,बार्शी), रिझवान जहांगिर काझी(रा.शीतल पेट्रोलपंपा शेजारी,कोंढवा पुणे),

कुंडलिक यशवंत शेंडगे (रा.शेंडगे प्लॉट,उपळाई रोड,बार्शी), कुमार विठ्ठल नागणे (रा.हेडेगल्ली, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत
बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक दगडू लांबतुरे (वय ५४) यांनी फिर्याद दिली ही घटना २३ नोव्हेंबर २०१६ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडली.

फिर्यादीत म्हटले आहे की, मुख्यालयाच्या संचालक मंडळाने २ कोटी रुपये क्रेडिट कर्ज व ४ कोटी रुपये मुदत कर्ज जमिन गट नं.८९९/१/ड गहाणखत सह.दुय्यम निबंधक कार्यालय यांचेकडे नोंद करुन दिले होते दरम्यान ३८ आर जमिनीवर गहाणखतान्वये फेरफार नोंद झाली भीमा रंगा मोरे यांचा ६ जून २०२१ रोजी मृत्यू झाला.

मुलगा रंगा मोरे याने वारसनोंदीसाठी १८ डिसेंबर २०२१ रोजी अर्ज दिला त्यामध्ये परशुराम मोरे यांचे नाव ३ ऑक्टोबर २०२२ रोजी हक्कसोड प्रमाणपत्र दुय्यम निबंधक कार्यालयातून विनामोबदला कमी करुन घेतले.
बॅंकेने दुय्यम निबंधक कार्यालयास ३१ मे २०२३ रोजी मिळकतीवर ६ कोटी बोजा आहे साठेखत , खरेदीखत बँकेच्या अधिकृत एनओसीशिवाय करु नये असे पत्र दिले होते त्याबाबत बँकेने वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती.

१७ सप्टेंबर २०२३ रोजी ०० हेक्टर ३८ आर पैकी ०० हेक्टर २८.५० आर जमीनीचे नोंदणीकृत बेकायदेशीरपणे खरेदीखत झाले आहे जमिनीची विक्री करुन बँकेची फसवणूक केली आहे असे म्हटले आहे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव तपास करीत आहेत.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












