कोरोनाच्या जीवघेण्या संकटाचा सामना करत दिवाळी देशभर मोठ्या उत्साहाने सुरू आहे. पण सणासुदीच्या काळात बँकेत जाण्यापूर्वी बँक सुरू आहे की नाही याची खात्री नक्की करून घ्या.
कारण, संपूर्ण महिन्यात मोठे सण असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. दिवाळीच्या दुसर्या दिवशीपासून सलग अनेक दिवस बँक बंद असणार आहेत.
तर 15 नोव्हेंबरला रविवारीदेखील देशभरात बँकिंगचं काम बंद असणार आहे. इतकंच नाही तर 16 नोव्हेंबरला देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.
यंदा 16 नोव्हेंबरला भाऊबीज असल्यामुळे बँका बंद असणार आहेत.दिवाळीनंतरही बँका सलग दोन दिवस बंद असणार आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा असल्यामुळे बँका बंद राहतील.
त्याचबरोबर रविवारी 22 नोव्हेंबरपासून सर्व राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी बँका बंद
नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबर हा चौथा शनिवार आहे, त्यामुळे देशभरातील बँकांमध्ये कोणतीही कामं होणार नाहीत. चौथा शनिवार हा बँकांच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे.
त्याचबरोबर, रविवारी 29 नोव्हेंबरलाही सगळीकडे बँक बंद असतील. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आणि कार्तिक पोर्णिमा आहे. त्यामुळे या दिवशीही बँकेला सुट्टी असेल.
या महिन्यात अनेक दिवशी बँक बंद असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने
ग्राहकांना नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे बँकिंगचं काम करण्याचा सल्ला दिला आहे.
नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँक बंद होईल
15 नोव्हेंबर – रविवारी – देशभरातील बँकांना सुट्टी
16 नोव्हेंबर – दिवाळी (बलिप्रतिपदा) / लक्ष्मी पूजा / भाऊबीज/ चित्रगुप्त जयंती, (अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, गंगटोक, कानपूर,
लखनऊ, मुंबई, नागपूर)
17 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजा / दिवाळी /
18 नोव्हेंबर – छठ पूजा (गंगटोक)
20 नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा, रांची)
21 नोव्हेंबर – छठ पूजा (पटणा)
22 नोव्हेंबर – रविवारी (देशभरातील बँका बंद)
23 नोव्हेंबर – सेन्ग कुट्सनेम (शिलाँग)
28 नोव्हेंबर – चौथा शनिवार (सर्वत्र)
29 नोव्हेंबर – रविवारी (सर्वत्र)
30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पोर्णिमा (ऐजवाल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, शिमला , श्रीनगर)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज