मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोना वेगाने वाढू लागला असतानाच बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे बँकेने आर्थिक व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत.त्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या खातेदारांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले. Bank of India’s mangalwedha branch closed indefinitel
कोरोना रुग्णांची संख्या शहर व तालुक्यात वाढू लागल्यामुळे रविवारी नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यापारी असोसिएशनची नगरपालिकेच्या सभागृहात बैठक घेऊन सोमवार पासून मंगळवेढा शहर पंधरा दिवस सकाळी 9 ते 2 या वेळेत चालू ठेवून इतर वेळी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे इतर वेळी पैशापासून आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सुट्टीनंतर बॅंकेत पैसे काढण्यासाठी खातेदार आले असता बॅंक बंद असल्याचे फलक निदर्शनास आल्यामुळे अनेक खातेदारांना रिकाम्या हाती परतावे लागले.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
शहरातील बॅंक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त आर्थिक व्यवहार होत आहेत. शाखेमध्ये सॅलिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देखील दिले आहे. अशा परिस्थितीतही खातेदारांकडून सोशल डिस्टन्स पालन न करणे, अनावश्यक कामासाठी बॅंकेत येणे, मास्क व्यवस्थित न लावणे यामुळे खातेदाराकडून संसर्गाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बॅंक व्यवस्थापनाने अनिश्चित काळासाठी आर्थिक व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय स्टेट बॅंकेनेनंतर सर्वात मोठी असलेल्या बॅंक ऑफ इंडियाला याचा फटका बसल्याने खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज