mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुजरातच्या विजयाने बेंगलोरचा पत्ता कट; मुंबईची लॉटरी, प्लेऑफसाठी अखेर 4 टीम्स ठरल्या, असं आहे वेळापत्रक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 22, 2023
in मनोरंजन
मंगळवेढेकरांना डे-नाईट सामन्याची मेजवानी; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

गुजरात टायटन्स टीमने या हंगामात 15 मे रोजी सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत प्लेऑफमध्ये धडक मारली. गुजरात सलग दुसऱ्यांदा 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली.

त्यानंतर 20 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर मात केली. चेन्नई अशाप्रकारे प्लेऑफला पोहचणारी दुसरी टीम ठरली.

या डबल हेडरमधील दुसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. लखनऊने या थरारक सामन्यात 1 धावेने विजय मिळवत प्लेऑफसाठी एन्ट्री मिळवली. लखनऊ प्लेऑफसाठी पात्र ठरणारी तिसरी टीम ठरली. त्यामुळे 4 पैकी 3 टीम निश्चित झाल्या.

आता जागा 1 आणि प्रबळ दावेदार 2, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स. रविवारी 21 मे रोजी या 16 व्या मोसमातील शेवटचं डबल हेडर खेळवण्यात आलं. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांना विजय गरजेचा होता.

मुंबईने या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर कॅमरुन ग्रीन याच्या शतकाच्या जोरावर विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.

मुंबईच्या विजयामुळे आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत जिंकावं लागणार होतं. या 21 मे रोजीच्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने होते.

आरसीबीने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर जीटीला 198 धावांचं आव्हान दिलं. मात्र जीटीने शुबमन गिल याच्या झुंजार शतकाच्या जोरावर ते आव्हान पूर्ण केलं. जीटीच्या या विजयाने मुंबईला लॉटरी लागली आणि पलटण प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. तर आरसीबीचं आव्हान साखळी फेरीतच संपलं.

अशा प्रकारे आयपीएल 2023 ला प्लेऑफसाठी 4 टीम मिळाल्या. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांमध्ये आता आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरात आणि चेन्नई या टॉप 2 मध्ये असल्याने या दोघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार आहेत. तर लखनऊ आणि मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. यामुळे या दोन्ही संघांना फायनलपर्यंत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत.

आता या निमित्ताने आपण आयपीएल 2023 प्लेऑफमधील सामन्याचं वेळापत्रक जाणून घेणार आहोत. प्लेऑफमधील सामन्यांना मंगळवार 22 मे पासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असं या प्लेऑफचं स्वरुप असणार आहे.

प्लेऑफ क्वालिफायर 1 मॅच ही गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या पैकी जिंकणारी टीम थेट फायनलला पोहचेल. तर पराभूत टीम क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर जिंकून येणाऱ्या टीम विरुद्ध भिडेल.

त्याआधी एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. एलिमिनेटर सामना जिंकणारी टीम क्वालिफायर 2 सामना खेळेल. या सामन्यात क्वालिफाय 1 मध्ये पराभूत झालेली टीम एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाविरुद्ध खेळेल. तर त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारी टीम थेट अंतिम सामन्यात पोहचेल. हा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या 2 संघाना फायनलसाठी 2 संधी

पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 स्पॉटवर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे बहुतांश संघांचा हा पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात गुजरात आणि चेन्नईने यश मिळवलं आहे. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईला 2 संधी मिळणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आयपीएल 2023

संबंधित बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे व उपसभापतीपदी यांची निवड

Breaking! मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे व उपसभापतीपदी यांची निवड

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा