टीम मंगळवेढा टाईम्स ।
दक्षिण भागातील पाटकळ, खूपसंगी, गोणेवाडी, मेटकरीवाडी, शिरशी, जुणोनी आदी गावांना उद्योजक बाळासाहेब ताड यांच्या वतीने आजपासून दररोज 25 हजार लिटर मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्योजक बाळासाहेब ताड यांच्या संकल्पनेतून दक्षिण भागातील जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळणार असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, उपसरपंच प्रदीप पवार, किसन ताड, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर ताड, मच्छिंद्र मेटकरी, विश्वास खुळे, शिवाजी खुळे, आबासाहेब सावत, माजी उपसरपंच दादा ताड,
माजी सदस्य सचिन मेटकरी, दिलीप लुगडे, धर्मराज मोरे, दिलीप सावंत महाराज, तानाजी भोसले, अरुण डांगे, दत्तात्रय कोळेकर, विठ्ठल क्षीरसागर, जगन्नाथ घाडगे, बिरुदेव कोळेकर, भीमराव मोरे सर, अण्णासाहेब चव्हाण, आबासो ताड, दिनेश लुगडे, आदीजन उपस्थित होते.
आमदार आवताडे बोलताना म्हणाले की, मुंबई मध्ये राहून सुद्धा गावाची नाळ न तोडणारे उद्योजक म्हणजे बाळासाहेब ताड यांनी सगळ्यात पुण्याईचे काम सुरू केले असून त्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेला दररोज पाणी मिळणार आहे.
येणाऱ्या काही काळातच उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण होऊन पाणी जनतेला मिळणार आहे. मी पोट निवडणुकीत निवडून गेलो आणि सत्तांतर झाले, लगेच योजनेला निधी मंजूर करून कामाला सुरुवात झाली आहे.
आत्तापर्यंत केवळ पाण्याच्या नावावर मताचा जोगवा मागण्यात आला आहे. आपली कळवल आपल्या माणसाला येते त्यामुळे मी निवडून येताच मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे.
मागील तीन वर्षात 4 हजार कोटी निधी आणला आहे, येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून पाणी, रस्ते, वीज आदी सर्व प्रश्न शिल्लक राहणार नाही असे आश्वासन आमदार आवताडे यांनी दिले आहे.
बाळासाहेब ताड जनतेशी नाळ जोडणारे उद्योजक
बाळासाहेब ताड यांनी मुंबईसारख्या शहरात राहून देखील आपल्या गावाची जवळीकता व आपल्या जनतेशी नाळ तुटू दिली नाही. हे खूप कौतुकास्पद असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले. व पाण्याची कमतरता भासणार नाही पुढील वर्षी टँकर ची आवश्यक भासणार नाही असे त्यांनी सांगितले.
पाठकळ गावाला मागेल तेवढा निधी देणार.
बाळासाहेब ताड यांच्या माध्यमातून पाटकल गावाला मागेल तेवढा निधी देणार असून गावात विकासाची गंगा वाहणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना भीमराव मोरे सर, सूत्रसंचालन रवी खिलारे व आभार किसन ताड यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज