आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.डॉ. शीतल आमटे या डॉ.विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समिती ,आनंदवन च्या CEO डॉ. शीतल ताई आमटे यांची आमहत्या ..
भावपुर्ण श्रद्धांजली????????..@AkshayMurkute @KiranBallal2017 @RRPSpeaks @Offiofjayantrp @amolmitkari22 @MurkuteSpeaks @MSSAnandwan pic.twitter.com/0ZO63rLLDu— Saurabh Murkute (@Spmurkutespeaks) November 30, 2020
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.करजगी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गेल्या 72 वर्षापासून महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पात कृष्ठरुग्णांवर उपचार केले जातात. कृष्टरुग्णांचे कुटुंबीय जर असतील तर त्यांना आनंदवनातच वेगळे घर देऊन पुनर्वसन केले जाते. जर कृष्ठरुग्ण एकटे असतील तर त्यांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते.
आजमितीस आनंदवनात एकूण 1500 लोक वास्तव्यास आहेत. यातील 450 कुटुंबीय आहेत तर 400 लोक एकटे आहेत.
काही दिवसांपूर्वी आल्या होत्या चर्चेत
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते.
या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.
या फेसबुक लाइव्हनंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला होता.
त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं. त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
या निवेदनावर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश – डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सह्या केल्या होत्या.
या प्रकरणाबाबत त्यांनी खुलासा केला होता. “दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं,” अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बोलताना दिली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज