मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती,
त्यानंतर आज देखील मराठा बांधवांना आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. मराठा बाधंवांना दिलासा मिळाला आहे, सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
त्यानंतर, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
सदर समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे मराठा बांधवांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलकांना मोठे आवाहन, थेट म्हटले, लवकरात लवकर.
काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. सध्या मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली आहे. पोलिस हे आंदोलन करणाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना मोठे आवाहन केले. बीएमसी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर आझाद मैदानावर पोहोचा असे त्यांनी म्हटले.
मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगितले आहे. यासोबतच रस्त्यावर लावलेली सर्व वाहने पार्किंग आणि मोकळ्या मैदानात लावण्यास त्यांनी सांगितले आहे. पिण्याचे पाणी आणि बाथरूमची व्यवस्था नसल्याने मुले मुंबई महापालिकेच्या इमारतीबाहेर जमल्याचे त्यांनी म्हटले.
सकाळपासूनच सीएसटीच्या पुढे ठिय्या आंदोलन करताना मराठा समाजाचे कार्यकर्त्ये दिसले. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांचे पाणी आणि अन्न बंद केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
त्यांंनी म्हटले की, राज्यामध्ये काही झाले आणि राज्यअस्थीर झाले तर याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील. बीएमसीच्या रस्त्यावर सकाळपासून मराठा आंदोलक ठिय्या करत आहेत.
आता मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बीएमसीच्या रस्ता मोकळा होता का? हे पाहण्यासारखे आहे. यासोबतच मोठा आरोप करत जरांगे पाटील यांनी म्हटले की, परिसरातील हॉटेल दुकाने बंद करण्यात आली आहेत.
मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असाहा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणे जरांगे पाटील हे टाळताना दिसत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज