टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील शिल्पकार अविनाश शिवशरण याच्या क्राऊन या शिल्पाची निवड द सोशल आर्ट अवॉर्ड, जर्मनी या पहिल्या आंतरराष्ट्रीय ५० कलाकृतींमध्ये झाली आहे. अविनाश हा एक महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेला असल्याने खरच तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून त्याच्या शिल्पास मत देऊन त्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.
अविनाशला जगात एक नंबरचा क्रमांक मिळवण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.खालील दिलेल्या लिंक वर ती जाऊन आपण आपले मत द्यावे.
https://social-art-award.org/https://social-art-award.org/application-award-2021?contest=photo-detail&photo_id=2945
या संकेतस्थळाला भेट देऊन ठी मत देता येईल.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील शिल्पकार अविनाश शिवशरण यांच्या क्राऊन या शिल्पाची निवड द सोशल आर्ट अवॉर्ड, जर्मनी या पहिल्या आंतरराष्ट्रीय ५० कलाकृतींमध्ये झाली आहे. यात १४७ देशांतून ७०० कलाकृती आल्या आहेत.
५० कलाकृतींची निवड अंतिम टप्यासाठी झाली आहे. निवड झालेल्या जणांमध्ये महाराष्ट्रातील ते एकमेव शिल्पकार आहेत. शिल्पकार शिवशरण हे अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल आर्टमध्ये फाइन आर्ट ही बॅचलर व मास्टर डिग्री दोन्ही पदवी प्राप्त केल्या. रिलायन्स मार्केटजवळ सध्या शिल्प स्टुडिओची उभारणी सुरू आहे.
क्राऊन शिल्पकृतीबद्दल …
शिल्पकाराच्या नजरेतून कलाकृतीकडे पाहणे गरजेचे असते. क्राऊन ही शिल्पकृतीबद्दल सांगताना शिल्पकार शिवशरण म्हणतात, मनीषी चिल्लर या जागतिक सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या फेरीसाठी एक प्रश्न विचारला होता की, सर्वात जास्त पगार कोणाला आहे.
त्यांनी उत्तर दिले होते आईला. आईची सेवा, तिचे प्रेम, तिचे कार्य पगारात मोजताही येणार नाही. याच उत्तराने मी भावनिक झालो. आई होण्यापूर्वी पुनर्जन्म, या नंतरही ती सतत अगदी आयुष्यभर आईपण निभावत असते. बाळाचा जन्म होतो तो क्षण तिचा क्राऊन असतो. हेच ते शिल्प.
तालुक्यासाठी अभिमानाची बाब
१४७ देशांतून ७०० कलाकारांनी द सोशल आर्ट अवॉर्ड , जर्मनया स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यापैकी एक आपल्या तालुक्यातील अविनाश शिवशरण हा कलाकार आहे. तो क्राऊनचे शिल्प तयार करून पहिल्या तीन मध्ये पोहोचला आहे. आपल्या देशांचे नेतृत्व करत आहे. त्यांनी दिलेल्या लिंकवर जाऊन जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा.व आपल्या महाराष्ट्राचा गौरव जागतिक पातळीवर पोहोचवूया. – आ.समाधान आवताडे
माध्यमे हाताळायला आवडतात
कोरोना शिल्पकृती संकल्पनेवर सध्या काम करीत आहेत. मी शिल्पकार आहे. प्रत्येक कलाकृती बनवण्यासाठी सिमेंट असो वा मेटे , माध्यम शिल्पकाराशी बोलत असते. संवाद असतो. मला सर्व माध्यमे हाताळायला खूप आवडतात. अविनाश शिवशरण , शिल्पकार , सोलापूर
संकेतस्थळाला भेट देऊन मत नोंदवा
क्रोन हे शिल्प सध्या ‘द सोशल आर्ट अवॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत सहभागी आहे. निवडक ५० कलावंतांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आहे. यानंतर टॉपटेन कलाकार जाहीर होतील. दि.७ ते १५ मे या कालावधीसाठी या शिल्पकृतींना पब्लिक व्होटसाठी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. https://social-art-award.org/https://social-art-award.org/application-award-2021?contest=photo-detail&photo_id=2945 या संकेतस्थळाला भेट देऊन १५ मेपर्यंत कलाकृतीसाठी मत देता येईल.
निवडक यादीत शिल्पकार शिवशरणच्या शिल्पांचा समावेश
अविनाश शिवशरण विविध कला प्रकार हाताळतात. शिल्पकृती निर्मितीत विशेष रस आहे. आंतरराष्ट्रीय कलाकृतींच्या निवडक यादीत शिल्पकार शिवशरण यांच्या शिल्पांचा समावेश झाला, ही सोलापूरसाठी अभिमानाची बाब आहे.- दीपक पाटील , प्राचार्य , अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज