टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या ६१०.२० ब्रास वाळूसाठयाचा लिलाव आज दि.२९ रोजी सकाळी ११.०० वा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.
इच्छूक व्यक्तींनी नमूद ठिकाणी वाळू साठयाची पाहणी करून लिलावात भाग घेण्याकरता दि.२७ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज प्रांत कार्यालयात सादर करावेत.
लिलावाच्या अटी ६१०.२० ब्रास वाळूची अपसेट प्राईस २२ लाख ५७ हजार ७४०, प्रस्तूत लिलावात भाग घेणेकरीता नमूद ठिकाणी उपस्थित राहून लघुत्तम किमतीच्या २५ टक्के रक्कम डी.डी.व्दारे जमा करणे गरजेचे,
प्रस्तूत लिलावात लिलाव घेणाऱ्या व्यक्तीस त्याच दिवशी बोललेल्या सर्वो त्तम बोलीच्या २५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी लागेल.
लिलावातील सर्वोत्तम बोलीची उर्वरीत २५ टक्के रक्कम सात दिवसाच्या आत शासकीय खजिन्यात भरणे अपेक्षित , बोलीची २५ टक्के रक्कम न भरल्यास लिलावात भाग घेतेवेळी भरलेली २५ टक्के रक्कम मिळणार नाही.
रक्कम भरल्यानंतर कार्यालयाकडील आदेश प्राप्त झाल्यावर लिलावातील वाळू नमूद ठिकाणावरून त्यांचेकडील वाहनाव्दारे उचल करावयाची आहे.
सदर लिलावात बोली बोलल्यास त्या बोलीची रकमेव्यतिरिक्त सोलापूर जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी रक्कम १० टक्केचा धनादेश कार्यालयात सादर करणे जरूरीचे आहे.
लिलावात भाग घेताना पुढील कागदपत्रे जोडावीत,अर्जाचे शुल्क रु .२००० रुपये रोखीने भरणे आवश्यक (विनापरतावा) आहे.
पॅन कार्ड झेरॉक्स स्वाक्षरीसह जोडावी. आधार कार्ड साक्षांकित प्रत जोडावी. शंभर रूपये स्टँप, जी. एस.टी. १८ टक्के भरण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दयावे. बँक पासबूक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडणे अपेक्षित आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज