टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुका भाजप कार्यकारिणी निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीत मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरच अधिक चर्चा झाली आणि ही पोटनिवडणुक पांडुरंग परिवाराने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
अखेर सर्व निर्णयाधिकार आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे सोपवून ही मीटिंग संपली. पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांची कार्यकारिणी निवडण्यात यावी , त्यासंदर्भात कार्यकत्यांनी बैठक घ्यावी अशी सूचना आ.प्रशांत परिचारक यांनी केली होती.
त्यानुसार आज येथील बाजार समितीच्या सभागृहात पांडुरंग परिवाराच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, भाजप अनु.सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे , पांडुरंगचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे आदींसह तालुक्यातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी पांडुरंग परिवाराने ही पोटनिवडणुक लढवावी अशी जोरदार मागणी केली.
यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रणव परिचारक यांच्या ही उमेदवारीची मागणी केली. मात्र सर्व निर्णयाधिकार आ. प्रशांत परिचारक यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अतिशय आग्रहाने मागणी केल्याचे दिसून आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज