मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
‘सासुरवाडीचे लोक त्रास देतात म्हणून जगण्याची इच्छा राहिली नाही’, असे म्हणत एकजणाने चक्क येथील शहर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. इतकेच नाही तर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमनाथ गणपत ठवरे (वय ४३, रा. तोंडले-बोंडले, ता. माळशिरस) हा इसम शुक्रवारी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास येथील शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षासमोर आला. ‘मला सासुरवाडीचे लोक त्रास देतात.
माझी जगायची इच्छा राहिली नाही. मी पंढरपूर एस.टी. स्टँडजवळ विषारी औषध पिऊन आलो आहे’, असे म्हणत तो आरडाओरडा करू लागला. तसेच हातात असलेली विषारी औषधाची बाटली त्याने तोंडाला लावली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस कर्मचारीही गोंधळून गेले. मात्र, तात्काळ सतर्कता दाखवत ठाणे अंमलदार शिंदे, महिला पोलीस कोळी, जवळगे, कदम यांनी ठवरे याला पकडून त्याच्या हातातील बाटली काढून घेतली.
त्याच्या तोंडाचा विषारी औषध पिल्यासारखा उग्र वास येत असल्याने उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज