टीम मंगळवेढा टाईम्स।
नागपूर महामार्गलगत काळूबाळूवाडी (ता. सांगोला) गावच्या हद्दीत असलेली कोट्यवधी रुपये किमतीची शेतजमीन बनावट शपथपत्राच्या माध्यमातून आहे.
स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहुल कुमार सुगाणावर (रा. ब्राह्मणपुरी, मिरज) याच्यासह १३ जणांवर सांगोला पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन स्वतःच्या नावावर केल्याप्रकरणी सुगाणावर त्याची आई, दोन बहिणींसह तलाठी, सर्कल आणि राहुल सुगाणावर याच्यासह नऊ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील डॉ. सचिन कुमार सुगाणावर यांनी फिर्याद दाखल केली. शेतातील असलेले सुमारे ६० लाख रुपयांचे लोखंडी अँगल, पत्रे व इतर साहित्य चोरीस गेल्याचे डॉ. सुगाणावर यांनी म्हटले आहे.
बनावट शपथपत्राच्या आधारावर फसवणूक करून सदरची शेत जमीन नांवावर करुन घेतली. त्यानंतर ती विक्रीस काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
यामध्ये संशयित म्हणून काळूबाळूवाडी ( तालुका सांगोला ) येथील तलाठी साईनाथ रामोड, सर्कल गजानन व्हनकडे आणि मुख्य संशयीत राहुल सुगणावर त्यांची आई शोभा कुमार सुगाणावर बहिण अश्वीनी पंकज देवमोरे,
दुसरी बहीण स्नेहा सुशांत निटवे, नातेवाईक शीतल महावीर सुगाणावर, अनिकेत अनिल सुगाणावर, संजय राजगोंडा सुगाणावर, महावीर परिसा सुगाणावर, अनिल पारिसा सुगाणावर, अशोक पारिसा सुगाणावर आणि राजगोंडा पारिसा सुगाणावर यांचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज