टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पार्टी मंगळवेढा शहर व ग्रामीणच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.
हिंदू धर्म हा देशाला लागलेली कीड आहे असे वक्तव्य जिंतेंद्र आव्हाड यांनी केले होते , त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवेढा शहरामधील दामाजी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. भारत माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय, जीतूद्दीन आव्हाड मुर्दाबाद अश्या पद्धतीच्या घोषणा देऊन फोटोला चपला मारण्यात आल्या.
यावेळी भाजप संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोकाट सुटलेला आमदार वारंवार हिंदू धर्मावर टीका करत आहे.
स्वतः मुस्लिम बहुबाल भागातून निवडून येऊन हिंदू धर्माला नाव ठेवण्याचं काम हा आव्हाड करत आहे.
या आधी देखील छत्रपती शिवरायांपेक्षा अफझलखान किती बलवान होता हे दाखवण्यासाठी आव्हाड ने जीवच रान केलं, आव्हाड सारख्या अश्या प्रवृत्ती हिंदू धर्माला लागलेली कीड आहे.
आव्हाड म्हणजे मुघलधार्जिन असून त्याने हिंदू धर्माला बोलून मत मिळवण्याचा प्रयत्न आहे. हा जितेंद्र नसून जीतूद्दीन आहे असा आरोप देखील भाजपचे शशिकांत चव्हाण यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम जातीयवाद केला पण आता राष्ट्रवादी जीतूद्दीन च्या माध्यमातून धर्मवाद करत आहे. प्रत्येकाला आपला धर्म हा मातृसमान आहे आणि हा आव्हाड आमच्या मातृत्वाला बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही.
आव्हाड हा हिंदू धर्मात जन्मलेला कलंक आहे. अश्यपद्धतीचे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , जिल्हा सचिव संतोष मोगले , तालुका सरचिटणीस विश्वास चव्हाण , दिगंबर भाकरे , प्रकाश भिंगे , ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुनील रत्नपारखी , शहराध्यक्ष गोपाळ भगरे ,
युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव , किसन मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय बुरकुल , उपाध्यक्ष नागेश डोंगरे , दीपक माने , युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे , सरचिटणीस अजित लेंडवे , जिल्हा उपाध्यक्ष सचिन बोडके , प्रकाश पवार , विनोद बिराजदार ,
साईनाथ शिंदे , सौरभ कानुरे , बंडू बुरकुल , विश्वास मोहिते , दिनेश लुगडे , अशोक गुंगे , उमेश विभूते आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज